Monday, March 16, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपड्यात श्री कानुदेवी व श्री कन्हेरदेवाचा शुभलग्न सोहळा उत्साहात संपन्न

शेकडों भाविकभक्तांना पुरणपोळीचा महाप्रसाद..बाविस्कर परिवारातर्फे यशस्वी आयोजन

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
April 19, 2025
in अध्यात्मिक, चोपडा
0
चोपड्यात श्री कानुदेवी व श्री कन्हेरदेवाचा शुभलग्न सोहळा उत्साहात संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.19  – शहरातील मल्हारपुरा येथील रहिवासी बाविस्कर कोळी परिवारातर्फे संकल्पित श्री कानुदेवी व श्री कन्हेरदेवांचा शुभलग्न सोहळा शेकडों भाविकभक्त व नगरवासीयांच्या उपस्थितीत विधिवत व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. खान्देशात कानुबाईचा पारंपारिक लग्नउत्सव सोहळा साजरा केला जातो. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांसह पुरणपोळीचा नैवेद्य व महाप्रसाद केला जातो. कानबाईला पार्वती देवीचा तर कन्हेरदेवाला भगवान शिवाचा अवतार मानला जातो. हा लग्नसोहळा चैत्र पौर्णिमेनिमित्त तीन दिवसांचा असतो. पहिल्या दिवशी रासपूजन, गहू दळणे, रत्ने आणणे, सवाद्य माता मिरवणूक, मोगरा थाट तर दुसऱ्या दिवशी पाणी आणणे, मांडव व कन्हेर आणणे, हळद लावणे, भोजन, गोरख फेरी, कानबाईचे लग्न, नारळ परनणे, महाप्रसाद भोजन भंडारा व रात्री देवीच्या भगतांची महाबैठक असते. तिसऱ्या दिवशी कानबाई मातेचे विसर्जन होऊन कार्यक्रम संपन्न होत असतो. याठिकाणी कानुदेवी सोबत कन्हेरदेवाची मुर्ती हुबेहूब व मनमोहक दिसत असल्याने उपस्थितांचे जणु डोळ्यांचे पारणे फिटल्या सारखे वाटत होते. सर्वांनी कानुदेवी व कन्हेर देवाचा जयघोष करून पुरणपोळी महाप्रसादाचा लाभ घेतला.

चोपडा मल्हारपुरा येथे कानुदेवी व कन्हेर देवाच्या लग्नउत्सव प्रसंगी उपस्थित जगन्नाथ बाविस्कर, चंद्रभान कोळी, मनोज वाघ व सहकारी भाविकभक्त मंडळ..

यासाठी शिव मल्हार गोरक्षनाथ आदेश देवऋषी संघटना मांडळचे अध्यक्ष मनोज वाघ (शिंदखेडा), तालुका अध्यक्ष जगन्नाथ बाविस्कर (गोरगावले बु.), मुख्य भगत चंद्रभान कोळी (बोहरा) त्यांचे सहकारी कुणाल भगत, सागर भगत, शांताराम कोळी, योगेश धनगर, गोलु भगत, राजु धनगर, सुभाष धनगर, विजय कोळी, बापु कोळी, जितेंद्र भिल, हिलाल धनगर, राजेन्द्र कोळी, सुनील भगत यांचेसह भिका बाविस्कर, गोविंदा बाविस्कर, नारायण बाविस्कर, गंगाराम बाविस्कर, विजय बाविस्कर,विशालराज बाविस्कर यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी अहोरात्र मेहनत घेतली. याप्रसंगी भाविकभक्त, माताभगिनी, आबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी जयेश बाविस्कर व मल्हारपुरा मित्रमंडळाने सर्वांचे जाहीर आभार मानले.

Post Views: 353
Previous Post

राज्यातील बसस्थानक अत्याधुनिक सेवासुविधायुक्त करणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Next Post

चोपड्यात गांजा घेवून येणारा मोटारसायकलस्वार अटकेत

Next Post
चोपड्यात गांजा घेवून येणारा मोटारसायकलस्वार अटकेत

चोपड्यात गांजा घेवून येणारा मोटारसायकलस्वार अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव दि. 14: जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने शनिवार, दि. 14 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता...

टेक स्पार्क 2K26 स्पर्धेत चोपडा अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

टेक स्पार्क 2K26 स्पर्धेत चोपडा अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 : दोंडाईचा येथील अहिंसा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे आयोजित टेक स्पार्क 2K26 या राज्यस्तरीय तांत्रिक...

राष्ट्रीय लोक अदालतीत चोपडा न्यायालयात 92 प्रकरणे निकाली; 17.95 लाखांची वसुली

राष्ट्रीय लोक अदालतीत चोपडा न्यायालयात 92 प्रकरणे निकाली; 17.95 लाखांची वसुली

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14: मा. उच्च न्यायालय, मुंबई तसेच मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या आदेशान्वये शनिवार, दि....

चोपडा नगरपरिषद सर्वसाधारण सभा ठरली वादळी!

चोपडा नगरपरिषद सर्वसाधारण सभा ठरली वादळी!

by टीम लोकप्रवाह
March 11, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 11 : चोपडा नगरपरिषदेत ५ मार्च रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत विविध ६६ विषयांवर चर्चा झाली. यामधील...

चोपडा नगरपरिषदेकडून ‘अभय योजना’ जाहीर; मालमत्ता कराच्या व्याज व दंडावर १००% सूट

चोपडा नगरपरिषदेकडून ‘अभय योजना’ जाहीर; मालमत्ता कराच्या व्याज व दंडावर १००% सूट

by टीम लोकप्रवाह
March 11, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 11| चोपडा नगरपरिषदेमार्फत शहरातील नागरिकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी निवासी मालमत्तांसाठी विशेष ‘अभय योजना’ जाहीर करण्यात आली आहे....

आनंदी जीवननासाठी कला गुण कौशल्य आत्मसात करावेत – डॉ.संजय पाटील

आनंदी जीवननासाठी कला गुण कौशल्य आत्मसात करावेत – डॉ.संजय पाटील

by टीम लोकप्रवाह
March 8, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा दि. 08 :  येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us