Monday, August 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

लैंगिक अत्याचार; अल्पवयीन मुलगी गरोदर!!

चोपडा शहर पोलीस स्टेशनला पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल 

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
August 27, 2025
in क्राईम, पोलीस डायरी
0
लैंगिक अत्याचार; अल्पवयीन मुलगी गरोदर!!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 27 – येथील शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या शिरपूर तालुक्यातील एका गावातील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर सन २०२३ पासून लैंगिक अत्याचार केला गेला. सदर पीडित मुलीचे पोटात दुखत असल्यामुळे दवाखान्यात उपचारासाठी गेली असता ती गरोदर असल्याचे समजले. त्यानंतर सदर अल्पवयीन पीडितेने तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची फिर्याद चोपडा शहर पोलीस स्थानकात दिली. सदर गुन्ह्यातील आरोपीस चोपडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिरपूर तालुक्यातील एक अल्पवयीन मुलगी चोपडा येथे इयत्ता बारावी वर्गात शिकत आहे. त्या अल्पवयीन मुलीवर अविनाश वेस्ता पावरा या इसमाने शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केला. यामधून सदर अल्पवयीन मुलगी हि गरोदर असल्याचे समजताच तिने चोपडा शहर पोलीस स्थानकात अतिप्रसंग झाल्याची फिर्याद दिली आहे. यानुसार अविनाश वेस्ता पावरा रा.अंमलवाडी पो. उमर्टी ता. चोपडा जि. जळगाव याचेविरुद्ध चोपड़ा शहर पो.स्टे. सी.सी.टी.एन.एस. गु.र.नं. 502/ 2025 भा.न्या.से. कलम 64, 65 (1) सह बालकांचे लैंगीक अत्याचारापासुन संरक्षण कायदा कलम सन 2012 चे कलम 4, 5 (1) (2), 6 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशीं हे करीत आहेत.
Post Views: 499
Previous Post

चोपड्यात जिल्हा परिषद उर्दू शाळेत ध्वजारोहण उत्साहात संपन्न!

Next Post

भगिनी मंडळ कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय खेल दिवस उत्साहात साजरा

Next Post
भगिनी मंडळ कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय खेल दिवस उत्साहात साजरा

भगिनी मंडळ कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय खेल दिवस उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us