Monday, August 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

भगिनी मंडळ कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय खेल दिवस उत्साहात साजरा

महाविद्यालयातील युवतींसाठी गोळाफेक स्पर्धेचे केले आयोजन

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
August 29, 2025
in चोपडा, खेळ, शैक्षणिक
0
भगिनी मंडळ कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय खेल दिवस उत्साहात साजरा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 29 – केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम आणि खेल मंत्रालय अंतर्गत स्वायत्त संस्था मेरा युवा भारत, जळगाव यांच्या मार्गदर्शनातून भगिनी मंडळ संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांची जयंती अर्थातच राष्ट्रीय खेल दिवस महाविद्यालयात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदाणकर, उपप्राचार्य डॉ.आशिष गुजराथी, डॉ.अनंत देशमुख, प्रा. नारसिंग वळवी, डॉ. विनोद रायपुरे आदिंची उपस्थिती होती.
आयोजित गोळफेक स्पर्धेत गोळा फेकतांना विद्यार्थिनी
राष्ट्रीय खेल दिनानिमित्त भगिनी मंडळ संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी गोळा फेक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तब्बल ४१ विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत गोळाफेक केले, यावेळी प्रा. समाधान सोनवणे यांनी गोळा फेक स्पर्धेच्या नियमावली विषयी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. या स्पर्धेत प्रिया राजेंद्र चव्हाण, दिव्या संजय महाजन, मनिषा जयसिंग पावरा, श्वेता प्रकाश सोनवणे हे विजेते ठरले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते शालेय पॅड, पेन व पुस्तक देवून गौरविण्यात आले.
त्यानंतर रासेयो प्रमुख कार्यक्रम अधिकारी प्रा. अनिल बाविस्कर यांनी ‘खेल निती – २०२५’ बद्दल उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमासाठी मेरा युवा भारतचे जिल्हा युवा समन्वयक अशोक मेघवाल यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. सुनिल पाचवणे यांनी केले तर रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. मोहिनी पाटील यांनी आभार मानले. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. अनिल बाविस्कर, प्रा. समाधान सोनवणे, प्रा. सुनिल पाचवणे, प्रा. भाग्यश्री महाजन, प्रा. मोहिनी पाटील, प्रथमेश भावसार, परेश चित्ते, अजय बारी, चंद्रकांत पाटील, सुरेश सपकाळे, देवेंद्र पाटील यांच्यासह प्रतिक कोळी, विनय जैन, भावेश कोळी आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमानंतर सर्वांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.

 

Post Views: 460
Previous Post

लैंगिक अत्याचार; अल्पवयीन मुलगी गरोदर!!

Next Post

शासकीय क्रीडा स्पर्धात महिला मंडळ शाळेचे उल्लेखनीय यश 

Next Post
शासकीय क्रीडा स्पर्धात महिला मंडळ शाळेचे उल्लेखनीय यश 

शासकीय क्रीडा स्पर्धात महिला मंडळ शाळेचे उल्लेखनीय यश 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us