Monday, March 16, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

शासकीय क्रीडा स्पर्धात महिला मंडळ शाळेचे उल्लेखनीय यश 

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
August 29, 2025
in चोपडा, खेळ
0
शासकीय क्रीडा स्पर्धात महिला मंडळ शाळेचे उल्लेखनीय यश 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 29 –  तालुकास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धेत बुद्धिबळ व कुस्ती ह्या क्रीडा प्रकारात येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत जिल्हास्तरीय स्पर्धांसाठी ते पात्र ठरले आहेत.
यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन करतांना मान्यवर
         येथील डॉ. सुरेशदादा पाटील महाविद्यालय व चावरा इंटरनॅशनल स्कूल येथे संपन्न झालेल्या अनुक्रमे कुस्ती व बुद्धिबळ या क्रीडा प्रकारात महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असून बुद्धिबळ स्पर्धेत १७ वर्ष वयोगटात चि. पियुष सचिन बारी व १४ वर्ष वयोगटात कु.चैताली दिपक माळी यांनी विजय मिळवला असून त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तर कुस्ती या क्रीडा प्रकारात १७ वर्ष वयोगटात मुलांमध्ये चि.गणेश दुर्गादास वैदू, चि.मंदार अमोल मराठे, चि.नकुल श्रीकृष्ण बडगुजर व मुलींमध्ये कु.मोहिनी अनिल महाजन हिच्यासह १४ वर्ष वयोगटात चि. पवन राहुल शेटे या विद्यार्थ्यांनी विजय मिळवत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. या विद्यार्थांना क्रीडा प्रशिक्षक योगेश शिरसाठ व क्रीडा शिक्षक विनोद शिरसाठ यांचे मार्गदर्शन लाभले.
   
              यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी विधानसभा अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी, संस्थेच्या अध्यक्ष पूनम गुजराथी, उपप्राचार्य डॉ. आशिष गुजराथी, मुख्याध्यापक सुनील पाटील, पर्यवेक्षक विजय पाटील यांच्यासह शिक्षक,  शिक्षकेतर वृंद व शाळेतील विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले असून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Post Views: 426
Previous Post

भगिनी मंडळ कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय खेल दिवस उत्साहात साजरा

Next Post

डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात वाणिज्य मंडळाचे उद्घाटन संपन्न 

Next Post
डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात वाणिज्य मंडळाचे उद्घाटन संपन्न 

डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात वाणिज्य मंडळाचे उद्घाटन संपन्न 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव दि. 14: जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने शनिवार, दि. 14 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता...

टेक स्पार्क 2K26 स्पर्धेत चोपडा अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

टेक स्पार्क 2K26 स्पर्धेत चोपडा अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 : दोंडाईचा येथील अहिंसा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे आयोजित टेक स्पार्क 2K26 या राज्यस्तरीय तांत्रिक...

राष्ट्रीय लोक अदालतीत चोपडा न्यायालयात 92 प्रकरणे निकाली; 17.95 लाखांची वसुली

राष्ट्रीय लोक अदालतीत चोपडा न्यायालयात 92 प्रकरणे निकाली; 17.95 लाखांची वसुली

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14: मा. उच्च न्यायालय, मुंबई तसेच मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या आदेशान्वये शनिवार, दि....

चोपडा नगरपरिषद सर्वसाधारण सभा ठरली वादळी!

चोपडा नगरपरिषद सर्वसाधारण सभा ठरली वादळी!

by टीम लोकप्रवाह
March 11, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 11 : चोपडा नगरपरिषदेत ५ मार्च रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत विविध ६६ विषयांवर चर्चा झाली. यामधील...

चोपडा नगरपरिषदेकडून ‘अभय योजना’ जाहीर; मालमत्ता कराच्या व्याज व दंडावर १००% सूट

चोपडा नगरपरिषदेकडून ‘अभय योजना’ जाहीर; मालमत्ता कराच्या व्याज व दंडावर १००% सूट

by टीम लोकप्रवाह
March 11, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 11| चोपडा नगरपरिषदेमार्फत शहरातील नागरिकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी निवासी मालमत्तांसाठी विशेष ‘अभय योजना’ जाहीर करण्यात आली आहे....

आनंदी जीवननासाठी कला गुण कौशल्य आत्मसात करावेत – डॉ.संजय पाटील

आनंदी जीवननासाठी कला गुण कौशल्य आत्मसात करावेत – डॉ.संजय पाटील

by टीम लोकप्रवाह
March 8, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा दि. 08 :  येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us