Friday, September 11, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपड्यात भरदिवसा दोन घरफोड्या करणाऱ्या अट्टल घरफोड्यास एलसीबीने केले गजाआड…!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
July 9, 2022
in क्राईम
0
चोपड्यात भरदिवसा दोन घरफोड्या करणाऱ्या अट्टल घरफोड्यास एलसीबीने केले गजाआड…!

लोकप्रवाह, चोपडा दि. ०९ जुलै –  दिनांक ३०/०६/२०२२ रोजी चोपडा शहरातील त्र्यंबक नगर व सहकार नगर याठिकाणी भरदिवसा घराफोडी करीत जवळपास ५ लाखाचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता. त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाकडून तपासाची चक्रे फिरविण्यात आली व अवघ्या दहा दिवसाच्या आत अट्टल घरफोड्या जिम्मी उर्फ दिपक विपीन शर्मा याला नंदूरबार येथून स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव येथील पथकाने ताब्यात घेत अटक करण्यात आली.

जिम्मी उर्फ दिपक विपीन शर्मा, घरफोडीतील आरोपी
सदर आरोपी हा इतका सराईत आहे की अवघ्या ३ मिनीटात मोठया स्वरुपाची घरफोडी करून मिळालेल्या पैश्यांनी मुंबई येथे जावून तेथून विमानाने दिल्ली, हरीयाणा, राजस्थान, गुजरात येथे पलायन करतो. तेथे मौजमजा करून तेथे पुन्हा मोठ्या स्वरूपाची घरफोडी करून तेथून पुन्हा विमानाने पलायन करतो. त्याचेवर इतर राज्यातदेखील ३० ते ४० गुन्हे दाखल आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक ३०/०६/ २०२२ रोजी या एकाच दिवशी चोपडा शहरात २ व अमळनेर शहरात १ अशी मोठ्या स्वरूपाच्या भरदिवसा घरफोड्या झाल्या होत्या. त्यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे व अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना सदर तपासाबाबत आदेश दिले. त्यावरून किरणकुमार बकाले यांनी त्यांचे स्वतंत्र पथक तयार करुन त्यात स.फौ. रवि नरवाडे, पो.हे.काँ. संजय हिवरकर, राजेश मंढे, संदिप पाटील, प्रविण मांडोळे, परेश महाजन, मुरलीधर बारी सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांचे पथक नेमण्यात आले होते.
स्थानिक गुन्हे शाखा, जळगांवकडील वरील पथक हे चोपडा व अमळनेर तालुक्यात फिरून गुप्त बातमीदारांमार्फत माहिती काढत असतांना पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, चोपडा व अमळनेर शहरात भरदिवसा झालेल्या घरफोडया करण्याची पध्दत एकच असल्याने सदरच्या घरफोडयांमध्ये मिळालेल्या तांत्रिक पुराव्यावरून सदरच्या घरफोडया या जिम्मी शर्मा रा. नदुरबार याने केल्याचे समजुन आल्याने पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी पथकास तात्काळ नंदुरबार येथे रवाना केले. जिम्मी शर्मा रा. नंदुरबार हा रेकॉर्डवरील दशहत माजवणारा गुंड प्रवृत्तीचा असल्याने त्याची गोपनीय माहिती काढून त्यास शिताफीने पकडून त्यास त्याचे नाव-गाव विचारले असता त्याने त्याचे नाव जिम्मी उर्फ दिपक विपीन शर्मा, वय २९, रा. गुरुकुल नगर नंदुरबार असे सांगितले. नंतर त्यास विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने १) चोपडा शहर पो.स्टे. CCTNS NO. २७२ / २०२२, २) चोपडा शहर पो.स्टे. CCTNS NO.२७३/२०२२, ३) अमळनेर पो.स्टे. CCTNS NO. ३०३/२०२२ या ३ घरफोडी त्यानीच केल्याचे कबुली दिली असून त्यास गजाआड करण्यात आले.
Post Views: 1,168
Previous Post

कझाकिस्तानची एलेना रिबाकिना विम्बल्डन ग्रँडस्लॅम विजेती रचला इतिहास…!

Next Post

चोपडा तालुकास्तरीय समन्वय व पुनर्विलोकन समितीची बैठक संपन्न…!

Next Post
चोपडा तालुकास्तरीय समन्वय व पुनर्विलोकन समितीची बैठक संपन्न…!

चोपडा तालुकास्तरीय समन्वय व पुनर्विलोकन समितीची बैठक संपन्न...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

चोपड्यात अतिक्रमणावर हातोडा; रस्ते झाले मोकळे!

चोपड्यात अतिक्रमणावर हातोडा; रस्ते झाले मोकळे!

by टीम लोकप्रवाह
August 28, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 28 : शहरातील रस्ते मोकळे करून वाहतूक सुरळीत करण्यासह शहराचे सौंदर्य वाढविण्याच्या उद्देशाने चोपडा नगरपरिषदेने अतिक्रमणाविरोधात...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us