महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाचा उल्लेखनीय निकाल : पियूष बारी विद्यालयात प्रथम

0
InShot_20260508_164128649

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 08 – येथील भगिनी मंडळ संचलित महिला मंडळ माध्यमिक विद्यालय चा मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षेचा निकाल ८१.८८ टक्के लागला असून विद्यालयाने यंदाही शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावण्याचा मान पियूष सचिन बारी या विद्यार्थ्याने मिळवला असून त्याने ९५.८० टक्के गुण संपादन करत उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये मृणाल शिवकुमार गुरव हिने ९३.२० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर जान्हवी गोपाल धनगर हिने ९०.०० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला. याशिवाय विद्यालयातील सोळा विद्यार्थ्यांनी विशिष्ट योग्यता श्रेणी प्राप्त करून यशाला गवसणी घातली आहे.


विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी, संस्थेच्या अध्यक्षा पूनम गुजराथी, उपाध्यक्षा छाया गुजराथी, सचिव उर्मिलाबेन गुजराथी, सहसचिव अश्विनी गुजराथी, उद्योजक आशिष गुजराथी तसेच समाजकार्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आशिष गुजराथी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील पाटील, पर्यवेक्षक विजय पाटील तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करत त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!