
चोपडा/पारोळा प्रतिनिधी : येथील एन. एस. गर्ल्स हायस्कूल मधील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कु. भूमिका उमाकांत पाटील हिने माध्यमिक शालांत परीक्षेत 83.50 टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
कु. भूमिका ही घोडगाव येथील उमाकांत काशिनाथ पाटील यांची कन्या असून तिच्या या यशाबद्दल शाळेचे चेअरमन वसंतकाका मोरे, मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी तिचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

तसेच घोडगाव येथील प्रकाशदादा रजाळे, सूतगिरणी संचालक, संजय पाटील, विजूआबा पाटील, प्रा. विजयकांत पाटील, प्रशांत सोनवणे, प्रा. दिनेश पाटील, प्रा. राहुल पाटील आदींसह अनेक मान्यवरांनी तिच्यावर अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव केला.









