बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

0
InShot_20260509_003746144

चोपडा प्रतिनिधी : नुकत्याच जाहीर झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेच्या निकालात बालमोहन विद्यालय येथील विद्यार्थी संकेत अजय जोशी याने 90.33 टक्के गुण संपादन करत विज्ञान शाखेत विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.

संकेतच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थाध्यक्ष श्री. चंद्रकांत (अण्णा) पाटील तसेच सर्व संचालक मंडळाने त्याचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

संकेत हा साने गुरुजी माध्यमिक विद्यालय येथे कार्यरत मुख्याध्यापक श्री. संजय जोशी यांचा पुतण्या असून श्री. अजय जोशी व सौ. सविता जोशी यांचा सुपुत्र आहे. त्याच्या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!