Friday, August 14, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा तालुकास्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात रक्षित महाजन प्रथम

शिवराज पाटील द्वितीय; दोन्ही विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
August 14, 2026
in महाराष्ट्र
0
चोपडा तालुकास्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात रक्षित महाजन प्रथम
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टिम लोकप्रवाह, चोपडा | दि. १३ 

‘भारतीय ऊर्जा क्षेत्र २०४७ – भवितव्य (संधी) व आव्हाने’ या विषयावर शिक्षण विभाग, पंचायत समिती चोपडा आणि विवेकानंद विद्यालय, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विवेकानंद विद्यालय, चोपडा येथे झालेल्या या विज्ञान मेळाव्यात चोपडा तालुक्यातील तब्बल २० शाळांनी सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी गटशिक्षणाधिकारी अजित पाटील अध्यक्षस्थानी होते. उद्घाटनप्रसंगी केंद्रप्रमुख नरेंद्र सोनवणे अध्यक्षस्थानी होते. यावेळी विद्यार्थ्यांना भारतीय ऊर्जा क्षेत्राचे २०४७ पर्यंतचे भवितव्य, उपलब्ध संधी, संभाव्य आव्हाने तसेच ऊर्जा क्षेत्रातील भविष्यातील बदल याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विज्ञान मेळाव्यासाठी परीक्षक म्हणून भूपेंद्र लक्ष्मणराव पाटील (हातेड) आणि संजय हरी पाटील (कोळंबा) यांनी काम पाहिले.

स्पर्धेत कस्तुरबा माध्यमिक विद्यालय, चोपडा येथील रक्षित आधार महाजन याने प्रथम क्रमांक पटकावला. प्रताप विद्या मंदिर, चोपडा येथील शिवराज अनिल पाटील याने द्वितीय क्रमांक मिळविला. प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या या दोन्ही विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यासाठी निवड झाली आहे.

पंकज विद्यालय, चोपडा येथील वैष्णवी भीमराव पाटील हिने तृतीय क्रमांक पटकावला. विवेकानंद विद्यालय, चोपडा येथील पर्वणी प्रसाद वैद्य आणि सी. बी. निकुंभ माध्यमिक विद्यालय, घोडगाव येथील प्रसन्न हिरालाल कोळी यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला.

कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी अजित पाटील, केंद्रप्रमुख नरेंद्र सोनवणे, विवेकानंद विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सरला शिंदे, पर्यवेक्षक पवन लाठी, चोपडा तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष भूपेंद्र लक्ष्मणराव पाटील, उपाध्यक्ष संजय हरी पाटील, सचिव विजया पाटील, सहसचिव निलेश पाटील, सदस्य एस. एम. चौधरी, प्रसिद्धी प्रमुख रुपेश नेवे, माजी मुख्याध्यापक नरेंद्र भावे, पी. एस. गुजराथी, एस. एल. पाटील, जे. डी. सोनवणे, संजय सोनवणे यांच्यासह तालुक्यातील विज्ञान शिक्षकांची उपस्थिती होती.

समारोपप्रसंगी परीक्षक भूपेंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे आणि सादरीकरणाचे कौतुक केले. विद्यार्थी मनोगत पर्वणी प्रसाद वैद्य हिने व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजया पाटील यांनी केले, तर आभार संजय पाटील यांनी मानले. विज्ञान मेळाव्याच्या यशस्वितेसाठी विवेकानंद विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सरला शिंदे, पर्यवेक्षक पवन लाठी, पंचायत समितीचे प्रशांत सोनवणे, विजय पाटील, जी. डी. पाटील, शिक्षण विभागातील अधिकारी-कर्मचारी, विवेकानंद विद्यालयातील शिक्षक व कर्मचारी तसेच विज्ञान मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या रक्षित महाजन आणि शिवराज पाटील यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Post Views: 76
Previous Post

आखतवाडे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचा गौरव

Next Post

बजरंगनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात सात दिवसीय नवनाथ पारायण सोहळ्यास प्रारंभ

Next Post
बजरंगनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात सात दिवसीय नवनाथ पारायण सोहळ्यास प्रारंभ

बजरंगनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात सात दिवसीय नवनाथ पारायण सोहळ्यास प्रारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

बजरंगनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात सात दिवसीय नवनाथ पारायण सोहळ्यास प्रारंभ

बजरंगनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात सात दिवसीय नवनाथ पारायण सोहळ्यास प्रारंभ

by टीम लोकप्रवाह
August 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 13 : बजरंगनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, दिंडोरी प्रणित येथे श्रावण मासानिमित्त आज, दि....

चोपडा तालुकास्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात रक्षित महाजन प्रथम

चोपडा तालुकास्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात रक्षित महाजन प्रथम

by टीम लोकप्रवाह
August 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | दि. १३  ‘भारतीय ऊर्जा क्षेत्र २०४७ – भवितव्य (संधी) व आव्हाने’ या विषयावर शिक्षण विभाग, पंचायत...

आखतवाडे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचा गौरव

आखतवाडे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचा गौरव

by टीम लोकप्रवाह
August 13, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. १३ : तालुक्यातील आखतवाडे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी या संस्थेने ३० जून २०२६ अखेर वितरित...

🚨 चोपड्यात दूषित पाण्यावरून विरोधक आक्रमक!

🚨 चोपड्यात दूषित पाण्यावरून विरोधक आक्रमक!

by टीम लोकप्रवाह
August 12, 2026
0

चोपडा | प्रतिनिधी : चोपडा शहरातील गढूळ व दूषित पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून राजकीय वातावरण तापले असून, विरोधी नगरसेवकांनी थेट प्रशासनाला धारेवर...

राष्ट्रीय ग्रंथालय दिनानिमित्त डॉ. एस. आर. रंगनाथन यांना अभिवादन

राष्ट्रीय ग्रंथालय दिनानिमित्त डॉ. एस. आर. रंगनाथन यांना अभिवादन

by टीम लोकप्रवाह
August 12, 2026
0

चोपडा | दि. १२ ऑगस्ट २०२६ : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती शरच्चंद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंजिनिअरिंग...

धुळे येथे श्री संजीव बैसाणे यांचा दुहेरी गौरव; उद्योग रत्न पुरस्कारासह चोपडा तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी!

धुळे येथे श्री संजीव बैसाणे यांचा दुहेरी गौरव; उद्योग रत्न पुरस्कारासह चोपडा तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी!

by टीम लोकप्रवाह
August 10, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दिनांक 10 : राजश्री शाहू महाराज जयंती उत्सव २०२६ निमित्त राष्ट्रीय मानवाधिकार एवं भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us