Friday, September 11, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

धक्कादायक ! नरबळीसाठी चिमुकलीचे अपहरण; मात्र पोलीसांच्या सतर्कतेने चिमुकलीची सुटका

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
July 24, 2022
in क्राईम
0
धक्कादायक ! नरबळीसाठी चिमुकलीचे अपहरण; मात्र पोलीसांच्या सतर्कतेने चिमुकलीची सुटका

पिंपरी चिंचवड : येथून एक धक्कादायक घटना समोर आलीय. पोलिसांनी अत्यंत शिताफीने तपास करत नरबळीचा प्रकार उघडकीस आणला आहे. साडे तीन वर्षांच्या चिमुकलीची अवघ्या दहा तासातच अपहरणातून सुटका केली.

कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्हीचा आधार घेत हे प्रकरण उघडकीस आणले. याप्रकरणी चार आरोपींना अटक तर दोन अल्पवयीन ताब्यात घेण्यात आले.
जुन्नर येथील संतोष चौघुले आणि विमल चौघुले या दाम्पत्याला पैशाचा हव्यास सुटला होता. नरबळी केल्यास मालामाल होतात म्हणून गेल्या आठवड्यात चौघुले कुटुंबीयांनी नरबळीचा कट रचला. यासाठी एका बाळाची त्यांना गरज होती.
विमल चौघुलेने याबाबत पिंपरी चिंचवडमध्ये वास्तव्यास असलेली तिची बहीण सुनीता नलावडेला याची कल्पना दिली. मग त्यांनी लगतच साडे तीन महिन्यापूर्वी आलेल्या कुटुंबाबाबत विमलला कळवलं. त्या कुटुंबात साडे तीन वर्षाची मुलगी होती. नरबळीसाठी तिचं अपहरण करायचं ठरलं.
यासाठी विमलने त्याच्या बारा वर्षाच्या मुलाला बहिणीच्या घरी पाठवलं. चार दिवसांपूर्वीच तो पिंपरी चिंचवडमध्ये आला, त्याच्यावर त्या चिमुकलीला विश्वासात घेण्याची जबाबदारी सोपवली. त्यानुसार तो आल्यापासून त्या चिमुकलीला खाऊ द्यायचा, तिच्यासोबत खेळायचा, तिला स्वतःचा मोबाईल खेळायला द्यायचा. अशा पद्धतीने चिमुकलीशी ओळख निर्माण केली. मग शनिवारी (23 जुलै) दुपारी खाऊ देतो असं सांगून, घरापासून दूर घेऊन गेला.

तिथं त्या बारा वर्षीय मुलाची आई म्हणजेच विमल थांबली होती. तिथून ते काही अंतर पुढं गेले आणि विमलने चिमुकलीला उचून घेतलं. तोंडावर कापड टाकलं आणि तिथून थेट जुन्नरचं घर गाठलं. विमलने मुलाला मात्र पिंपरी चिंचवडच्या बहिणीकडेच ठेवलं. पोलिसांना चक्राऊन सोडण्यासाठी ही खेळी आखण्यात आली होती. दुसरीकडे बराच वेळ झाला तरी आपली मुलगी घरी येईना म्हणून चिमुकलीच्या आईने चिखली पोलिसांकडे अपहरणाची तक्रार केली. पोलीस आयुक्त अंकुश शिंदेंना प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आलं होतं. तपास एपीआय तौफिक सय्यद यांच्याकडे सोपविण्यात आला. सोबतीला गुन्हे शाखेचे पथक देण्यात आलं.

जवळपास दोनशे कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही तपासले त्यात बारा वर्षाच्या मुलासोबत ती आढळली, म्हणून त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली. पण मी त्या दुकानातून लगेच घरी आलो, असं उत्तर त्याने दिलं. तिथून पुढच्या दुकानात ही तोच बारा वर्षाचा मुलगा चिमुकलीसोबत दिसला. मग मात्र तो खोटं बोलत असल्याचं निष्पन्न झालं. तरी तो मात्र कबुली देत नव्हता. मग तिच्या कुटुंबियांच्या घरी जुन्नर पोलिसांना पाठविण्यात आलं. तिथं ती चिमुकली आढळून आली. अवघ्या दहा तासात चिमुकलीची सुखरूप सुटका करण्यात आली. याप्रकरणात सहभागी चौघुले आणि नलवडे कुटुंबियातील चौघांना अटक आणि दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतलं आहे.

Post Views: 266
Previous Post

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल येथील विद्यार्थ्यांचे सीबीएसई परीक्षेत घवघवीत यश; हर्षदा सोनवणे तालुक्यात प्रथम !

Next Post

चोपडा-धनवाडी रस्त्यावरील खड्डे बुजवा अन्यथा खड्डयांमध्ये मत्स्यपालनाची परवानगी द्या; चोपडा मनसेची मागणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

चोपड्यात अतिक्रमणावर हातोडा; रस्ते झाले मोकळे!

चोपड्यात अतिक्रमणावर हातोडा; रस्ते झाले मोकळे!

by टीम लोकप्रवाह
August 28, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 28 : शहरातील रस्ते मोकळे करून वाहतूक सुरळीत करण्यासह शहराचे सौंदर्य वाढविण्याच्या उद्देशाने चोपडा नगरपरिषदेने अतिक्रमणाविरोधात...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us