Monday, August 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

अडावद येथील गणेश कासार यांची ‘गुगल’ मध्ये निवड! ; चोपडा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
August 1, 2022
in तालुका विशेष
0
अडावद येथील गणेश कासार यांची ‘गुगल’ मध्ये निवड! ;  चोपडा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लोकप्रवाह, चोपडा दि. ०१ आॕगस्ट – तालुक्यातील अडावद येथील गणेश शशिकांत कासार या तरूणाची जगातील आघाडीचे सर्च इंजिन असलेल्या गुगल कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून निवड झाली आहे. ग्रामीण भागात शिक्षण घेत जगातल्या मोठ्या कंपनीमध्ये नोकरी मिळविणे खूप अभिमानास्पद बाब आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअर असणाऱ्या गणेश कासार याने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर ही संधी मिळवली. ग्रामीण भागातील गणेशने आपल्या गुणवत्तेच्या कौशल्यावर घेतलेली गगनभरारी इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.

गणेश शशिकांत कासार, अडावद ता. चोपडा जि. जळगांव

गुगल…इंटनेटचा वापर करणाऱ्या प्रत्येकासाठीच हे नाव अत्यंत जिव्हाळ्याचं. गुगल हे महाजालावरचं लोकप्रिय सर्च इंजिन. गुगलच्या सर्च इंजिनमध्ये मजकूर टाकायचा अवकाश की काँम्पुटर स्क्रीनवर हजारो पर्याय दिसू लागतात, अश्या या गुगल कंपनीत चोपडा तालुक्यातील अडावद येथील गणेश शशिकांत कासार या युवकाची सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून निवड होणे अडावदसह संपुर्ण तालुक्याकरीता भुषणावह बाब असुन गणेशच्या या नेत्रदीपक कामगिरीने अडावद गावासह तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. अत्यंत हुशार असलेला गणेश याने कठोर मेहनत व अभ्यासाचे व्यवस्थित नियोजन करून यश संपादन केले. गणेशचे प्राथमिक शिक्षण अडावद येथील ब.ग.ट्रस्ट च्या नूतन प्रायमरी इग्लिश मेडीयम स्कुल मध्ये तर माध्यमिक चोपडा येथील मेमोसा विद्यालय आणि उच्च माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या कला,शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा येथे झाले नंतर सांगली येथील वालचंद कॉलेजला इंजिनियरींगचे  शिक्षण घेत असतानाच पहिल्याच प्रयत्नात त्याने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर जगातील एक नंबरची कंपनी असलेल्या ‘गुगल’ मध्ये स्थान मिळविले.

यानिमित्त चोपडा महाविद्यालयात गणेशचा समारंभपूर्वक सत्कार उपप्राचार्य बी.एस.हळपे यांनी केला. गणेश हा अडावद येथील व्यापारी गौरव सेल्सचे संचालक शशिकांत प्रभाकर कासार यांचा सुपुत्र आहे. त्याच्या या दैदीप्यमान यशाने येथील कासार कुटुंबियांवर असलेला सरस्वती मातेचा वरदहस्त आशिर्वाद कायम असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. दरम्यान अडावद गावाच्या नावलौकिकात भर घालणारी कामगिरी करणाऱ्या गणेश शशिकांत कासार याचे चोपडा तालुक्यासह पंचक्रोशीतून अभिनंदन होत आहे.

Post Views: 789
Previous Post

धानोरा येथील नेहा परमार ची पश्चिम बंगाल येथील रायफल शुटिंग स्पर्धेसाठी निवड!

Next Post

राष्ट्रपुरुषांच्या त्यागाने घडला भारत  – प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी

Next Post
राष्ट्रपुरुषांच्या त्यागाने घडला भारत  – प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी

राष्ट्रपुरुषांच्या त्यागाने घडला भारत  - प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंचमंडळ व सर्व समाज...

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा...

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us