Monday, August 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

राष्ट्रपुरुषांच्या त्यागाने घडला भारत  – प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
August 2, 2022
in शिक्षण
0
राष्ट्रपुरुषांच्या त्यागाने घडला भारत  – प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. ०२ आॕगस्ट – येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य कनिष्ठ  महाविद्यालयातील  इंग्लिश भाषा अभ्यास मंडळ व भाषा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सर्वप्रथम मान्यावरांच्या हस्ते लोकमान्य टिळक व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.डी.ए.सुर्यवंशी म्हणाले की, ‘आजचा भारत हा थोर महापुरुषांच्या त्यागाने सुजलाम – सुफलाम झाला आहे. थोर महापुरुषांची जयंती व पुण्यतिथी साजरा करण्याचा उद्देश हा वैचारिक असायला हवा, तात्पुरता नसावा प्रत्येकाने आपल्या आयुष्यात महापुरुषांचे गुण आत्मसात करून समाज परिवर्तनासाठी आपले योगदान द्यावे. राष्ट्रपुरुषांचा इतिहास हा वाचनाद्वारे समजून घेणे गरजेचे आहे. यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्याना लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या विविध कादंबऱ्यांची व कथांची नावे सांगून  सदर साहित्य ग्रंथालयात जाऊन वाचण्याचे व त्यातील ज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन केले. कला व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल अभ्यासपूर्ण भाषणं दिली. मान्यवरांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आली. याप्रसंगी व्यासपीठावर पर्यवेक्षक प्रा.एस.पी. पाटील, समन्वयक प्रा.ए. एन. बोरसे , प्रा.एस.टी.शिंदे, प्रा. संदीप बी. पाटील, प्रा. ए. पी.लांडगे आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा बी एस हळपे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन 12 वी कला ची विद्यार्थीनी कु.मानसी निकम व प्रा. विवेकानंद शिंदे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. संदीप देवरे यांनी  केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.सुनंदा नन्नवरे प्रा. दिपक करंकाळ, प्रा. निवृत्ती पाटील, प्रा. सौरभ जैन, प्रा.शिरीष ठाकरे, प्रा.साक्षी गुजराथी, श्री. राकेश काविरे व राहुल पाटील यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.
Post Views: 333
Previous Post

अडावद येथील गणेश कासार यांची ‘गुगल’ मध्ये निवड! ; चोपडा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

Next Post

महिला मंडळ शाळेत महापुरुषांना अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

Next Post
महिला मंडळ शाळेत महापुरुषांना अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

महिला मंडळ शाळेत महापुरुषांना अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंचमंडळ व सर्व समाज...

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा...

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us