Monday, August 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

महिला मंडळ शाळेत महापुरुषांना अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
August 2, 2022
in शिक्षण
0
महिला मंडळ शाळेत महापुरुषांना अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. ०२ आॕगस्ट – येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालय भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त या महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. तसेच याप्रसंगी शालेय स्तरावरील वक्तृत्व स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव येथील निवृत्त कलाशिक्षक व ख्यातनाम चित्रकार राजू बाविस्कर हे होते. तर मंचावर मुख्याध्यापक सुनील चौधरी, पर्यवेक्षक सुनील पाटील, ज्येष्ठ शिक्षक भास्कर माळी, अनिल महाजन, मिशन बंगला वसतिगृह अधीक्षक निलेश सपकाळे हे उपस्थित होते.
प्रत्येकाच्या जीवनात वाचन अत्यंत महत्त्वाचे असून वाचनाने माणूस समृद्ध होतो. लोकमान्य टिळक तसेच अण्णाभाऊ साठे यांनी ग्रंथ वाचनासोबतच मनुष्य आणि समाजाच्या समस्या वाचण्याचा प्रयत्न केला. समाजाचे दुःख समजून घेतले. त्यांनी आपल्या लेखनातून आणि वाणीतून समाजाला दिशा दिली, असे प्रतिपादन राजू बाविस्कर यांनी याप्रसंगी केले.
मनोगत व्यक्त करतांना ख्यातनाम चित्रकार राजू बाविस्कर…
वक्तृत्व स्पर्धेमध्ये इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी महापुरुषांबद्दल आपले विचार व्यक्त केले. यशस्वी विद्यार्थ्यांना यावेळी बक्षीसे देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण चंद्रकांत चौधरी व संजय बारी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय सोनवणे यांनी तर परिचय अनिल महाजन यांनी व आभार प्रदर्शन सुनील पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वनराज महाले, भावेश लोहार यांच्यासह बाळासाहेब भालेराव, संजय पाटील यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 322
Previous Post

राष्ट्रपुरुषांच्या त्यागाने घडला भारत  – प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी

Next Post

एसएनआरजी इंग्लिश मिडीयम स्कुल तर्फे घोडगाव व वाळकी येथे वृक्षारोपण

Next Post
एसएनआरजी इंग्लिश मिडीयम स्कुल तर्फे घोडगाव व वाळकी येथे वृक्षारोपण

एसएनआरजी इंग्लिश मिडीयम स्कुल तर्फे घोडगाव व वाळकी येथे वृक्षारोपण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंचमंडळ व सर्व समाज...

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा...

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us