Monday, August 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

अबब… अख्खा रस्ताच केला गडप ! तावसे बु. गावातील प्रकार; माहिती अधिकारात बाब उघड…

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
August 3, 2022
in तालुका विशेष
0
अबब… अख्खा रस्ताच केला गडप !   तावसे बु. गावातील प्रकार; माहिती अधिकारात बाब उघड…
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. ०३ आॕगस्ट – सन २०१४ – १५ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा २००५ अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत तब्बल १५ लाख रुपये खर्च करून तालुक्यांतील तावसे बु. येथील शेतकरी रविंद्र मुलचंद पाटील यांच्या शेतापासून ते अशोक रामचंद्र जाधव यांच्या शेतापर्यंतचा शेतरस्ता फक्त कागदोपत्री झाल्याचे आढळून आले आहे. मात्र प्रत्यक्षात सदर शेत रस्ता झालाच नाही. हा संपूर्ण प्रकार माहिती अधिकारात उघड झाला आहे.
सदर रस्ता प्रत्यक्षात झालाच नाही म्हणून सदर रस्ता व कामाची चौकशी व्हावी यासाठी संदीप अमृत बाविस्कर यांनी २१/ १२/ २०१८ रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. तसेच २७ जुलै रोजी रमेश भिला कोळी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे रस्त्याच्या चौकशीसाठी तक्रार अर्ज दाखल केला आहे. तर २८ जून रोजी पत्रकार राजेंद्र पाटील यांनी देखील माहितीचा अधिकार अर्ज टाकला होता.
सदर रस्ता प्रत्यक्षात झालाच नाही. तर तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक व अधिकारी यांनी संगनमत करून सदर रस्त्याचे व नाल्यावरील पुलाचे प्रत्यक्ष काम न करता फक्त कागदावरच केलेले दिसून येत आहे. सदरील रस्त्याच्या कामात शासनाची फसवणूक करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे. तरी संबंधितांची चौकशी होऊन गुन्हेगारांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. सदर रस्ता व कामाची चौकशी न केल्यास गटविकास अधिकारी कार्यालायासमोर आमरण उपोषणाचा इशारा तक्रारदार यांनी दिला आहे.
Post Views: 319
Previous Post

संजय राऊतांना आव्हान देणाऱ्या स्वप्ना पाटकर आहेत तरी कोण? जाणून घेवूयात!

Next Post

किल्ले चौगावच्या विकासासाठी कटिबद्ध  : प्रांताधिकारी सीमा अहिरे 

Next Post
किल्ले चौगावच्या विकासासाठी कटिबद्ध  : प्रांताधिकारी सीमा अहिरे 

किल्ले चौगावच्या विकासासाठी कटिबद्ध  : प्रांताधिकारी सीमा अहिरे 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा...

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us