Monday, August 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

भगिनी मंडळ नर्सिंग कॉलेजच्या वतीने जागतिक स्तनपान सप्ताहनिमित्त जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
August 6, 2022
in आरोग्य, शिक्षण
0
भगिनी मंडळ नर्सिंग कॉलेजच्या वतीने जागतिक स्तनपान सप्ताहनिमित्त जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. ०६ आॕगस्ट – येथील शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजेच नगरपरिषद रुग्णालय येथे भगिनी मंडळ नर्सिंग कॉलेजच्या वतीने 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त  विविध उपक्रमांनी जनजागृती करुन जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करण्यात आला. नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी रोशनी खाटिक, गायत्री धनगर व नैना मराठे यांनी “स्तनपानाचे महत्व” या विषयाबाबत गरोदर मातांमध्ये जाणीव निर्माण करून त्याविषयीच्या शंका व गैरसमज दूर केले.
जागतिक स्तनपान दिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रमात उपस्थित डॉ. चंद्रकांत बारेला, भगिनी मंडळ नर्सिंगचे प्रा. अशपाक पिंजारी व प्रशिक्षणार्थी…
बाळाला योग्य वयात व पुरेसे स्तनपान देण्याबाबत मातांना माहिती देऊन चित्र प्रदर्शन घेण्यात आले.
तसेच नवजात शिशुंच्या आरोग्यासाठी, शारीरिक व बौद्धिक विकासासाठी सुद्धा बाळास स्तनपान देणे किती फायद्याचे आहे हे यावेळी सांगण्यात आले. बाळाची वाढ व विकासविषयक गरज भागविण्यासाठी योग्य प्रमाणात प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, खनिजे, जीवनसत्वे व पाणी यासारख्या अन्न घटकांचे सर्वोत्तम संतुलन मातेच्या दुधामुळे बाळास प्राप्त होते. स्तनपान हे बाळाचे पहिले लसीकरण आहे असे मानले जाते त्यामुळे जंतुसंसर्गविरुद्ध संरक्षण मिळते. बाळाला त्याच्या वयाच्या पहिल्या सहा महिन्यापर्यंत फक्त आईचे दूधच द्यावे. जन्मानंतर लगेच अर्ध्या तासात बाळाला अंगावर पाजण्यास मातेने सुरुवात करण्याची गरज आहे. बाळाला स्तनपान लवकर सुरू केल्याने आई व बाळाचे भावनिक नाते निर्माण होते. ही बाळाचा विकास व शिक्षणाची पहिली पायरी आहे. याप्रकारे स्तनपान सप्ताहाबद्दल सखोल मार्गदर्शन गरोदर माता यांना यावेळी देण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शहरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.चंद्रकांत बारेला, संस्थेच्या अध्येक्षा पुनम गुजराथी यांच्या मार्गदर्शनाखाली  प्रा. अशफाक पिंजारी, भगिनी मंडळ नर्सिंग कॉलेज येथील प्रशिक्षणार्थी व नगरपरिषद रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 494
Previous Post

ITBP Bharati 2022 : 10 वी उत्तीर्णांना देशसेवेची संधी!! इंडो-तिबेटियन बाॕर्डर पोलीस फोर्समध्ये भरती सुरु..

Next Post

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव युनिटतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत “हर घर झेंडा” या उपक्रमासहीत विविध उपक्रमांचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंचमंडळ व सर्व समाज...

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा...

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us