Thursday, September 17, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा आॕनर किलिंग प्रकरण; अखेर त्या वकीलावर गुन्हा दाखल!! आरोपींची संख्या आता १३, दोघे अद्याप फरार.

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
August 20, 2022
in क्राईम
0
चोपडा आॕनर किलिंग प्रकरण; अखेर त्या वकीलावर गुन्हा दाखल!! आरोपींची संख्या आता १३, दोघे अद्याप फरार.

लोकप्रवाह, चोपडा दि.२० आॕगस्ट : प्रेमप्रकरणातून बहिणीचा भावानेच गळा आवळून तर तिच्या प्रियकरावर गोळी झाडून दोघांची हत्या केल्याच्या प्रकरणात आता वकील अॕड. नितीन पाटील याच्याविरुद्ध चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. आतापर्यंत १३ जणांना आरोपी करण्यात आले आहे.

प्रेम प्रकरणाच्या संशयातून वर्षा समाधान कोळी (वय २०, रा. सुंदरगगढी, चोपडा ) आणि राकेश संजय राजपूत (वय २२, रा. रामपूरा चोपडा) या दोघांची हत्या करण्यात आली होती. वराड रस्त्यावर दि १२ ऑगस्टला घटना घडल्यानंतर आरोपी करण उर्फ कुणाल हा गावठी कट्टा घेऊन स्वतः पोलिसात हजर झाला आणि गुन्ह्याची कबुली दिली होती. पहिल्या दिवशी पाच आरोपी होते. त्यानंतर आजअखेर एकूण १३ जणांना आरोपी केले आहे. यात अॕड. नितीन पाटील (रा. गरताड, ता. चोपडा) व गावठी कट्टा पुरवणारा मध्य प्रदेशातील शेखर शिकलकर या दोघांचाही समावेश आहे. अ़ॕड. नितिन पाटील याने अटकपूर्व जामिनासाठी अमळनेर कोर्टात अर्ज दाखल केला आहे.

या प्रकरणात आतापर्यंत एकूण १३ जणांवर गुन्हा दाखल झाला असून ११ जणांना ताब्यात घेतले आहे. अॕड. नितिन पाटील व शिखलकर हे दोघे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. अॕड.पाटील व खुनातील आरोपी यांच्यात यावल रस्त्यावरील पेट्रोल पंपालगतच्या एका हॉटेलात बसून पुरावे नष्ट करण्याबाबत चर्चा झाली होती, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. दरम्यान, आरोपी असलेल्या दोन अल्पवयीन मुलांना जळगाव बाल सुधारगृहात पाठवले आहे. मुलीच्या आईसह नऊ जणांना शुक्रवारी चोपडा न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

सुरुवातीला या गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन बालकांसह भरत संजय रायसिंग (वय २२ वर्ष रा. सुंदरगढी चोपडा ता. चोपडा), बंटी उर्फ जय शांताराम कोळी (वय १९ वर्ष रा. पंकज स्टाफ चोपडा ता. चोपडा), तुषार आनंदा कोळी(रा. माचला) रत्नाबाई समाधान कोळी (वय ३७ वर्ष रा. सुंदरगढ़ी चोपडा ता. चोपडा), मयुर काशीनाथ वाकडे (वय २३ वर्ष रा. मंदिराजवळ अरुण नगर चोपडा ता. चोपडा), शांताराम कोळी (वय ५६ वर्ष रा. शिंदेवाडा चोपडा ता. चोपडा), आनंदा आत्माराम कोळी (वय ४५ वर्ष रा. माचला ता. चोपड़ा), पवन नवल माळी (वय २२ वर्ष रा. पाटीलगढी चोपडा ता. चोपडा), रविंद्र आनंदा माळी (वय २० वर्ष रा. माचला ता. चोपडा)  अशा ११ संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

Post Views: 1,465
Previous Post

चोपडा येथे कापूस पिकावरील बोंड अळी व बोंड सड व्यवस्थापन यासंबंधी शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Next Post

चोपडा तालुका फोटोग्राफर असोसिएशन च्या वतीने जागतिक फोटोग्राफी दिवस साजरा

Next Post
चोपडा तालुका फोटोग्राफर असोसिएशन च्या वतीने जागतिक फोटोग्राफी दिवस साजरा

चोपडा तालुका फोटोग्राफर असोसिएशन च्या वतीने जागतिक फोटोग्राफी दिवस साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us