Thursday, September 17, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपड्यात रोटरी तर्फे शिक्षक दिनानिमित्त ‘नेशन बिल्डर अवॉर्ड – २०२२’ चा वितरण सोहळा उत्साहात संपन्न

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
September 8, 2022
in वैशिष्ट्यपूर्ण
0
चोपड्यात रोटरी तर्फे शिक्षक दिनानिमित्त ‘नेशन बिल्डर अवॉर्ड – २०२२’ चा वितरण सोहळा उत्साहात संपन्न
लोकप्रवाह, चोपडा दि.८ आॕगस्ट – शिक्षकाची भावना आणि भूमिका विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडवत असते. प्रत्येक शिक्षकाला आई होता आले पाहिजे. शिक्षकाच्या ठायी वक्ता, नेता व अभिनेता या त्रिगुणांचा सुरेख संगम असला पाहिजे. स्पर्धेच्या युगामध्ये विचारांचे अधोरेखन होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी शिक्षकांनी सातत्याने प्रयत्नशील असले पाहिजे, असे विचार प्रसिद्ध साहित्यिक व कवी प्रा. वा. ना. आंधळे यांनी व्यक्त केले. ते आनंदराज पॅलेस येथे रोटरी क्लब ऑफ चोपडा तर्फे शिक्षक दिनानिमित्त आयोजित ‘नेशन बिल्डर अवॉर्ड-२०२२’ वितरण सोहळ्यात बोलत होते. याप्रसंगी मंचावर रोटरीचे सहप्रांतपाल रोटे. नितीन अहिरराव, चोपडा रोटरीचे अध्यक्ष रोटे.ॲड. रुपेश पाटील, सचिव रोटे.गौरव महाले प्रकल्प प्रमुख रोटे.आरिफ शेख हे उपस्थित होते.
यावेळी उपस्थित शिक्षक व पालकांना मार्गदर्शन करताना प्रा.आंधळे म्हणाले, कवितेतून आपले व्यक्तिमत्व घडत असते. तात्विक, अर्थपूर्ण आणि गेय कविता आयुष्य घडवतात. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत गाण्याचे आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कवितेतील सुरावट हरवू नये कविता ही आपली तसेच संस्कृतीची देखील आई आहे. आजकाल कविता लक्षात राहत नाहीत याचा अर्थ कवीचे सूर हरवले आहेत का? असा प्रश्न पडतो. अनेक कविता व विनोदी किस्स्यांची मिश्किलपणे पेरणी करत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी देविदास हिरामण महाजन (झि.तो.महाजन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, धानोरा), प्रविण आबाजीराव पाटील (आईसाहेब चिंधाबाई निंबाजी पाटील माध्यमिक विद्यालय, माचले), संजय हरी पाटील (श्री गुरुदेव माध्यमिक विद्यालय, कोळंबा), अजिजखान समद खान (अँग्लो उर्दू हायस्कूल, अडावद), शीला सुनील देशमुख (माध्यमिक विद्यालय, चुंचाळे), राजश्री किशोर पवार (कुरवेल हायस्कूल, कुरवेल), जगदीश शांतीलाल महाजन (धनाजी नाना आदिवासी आश्रमशाळा, सत्रासेन), किरण सुपडु पाटील (माध्यमिक आश्रमशाळा, बोरअजंटी), भास्कर शंकरराव पाटील (जि प शाळा, खेडीभोकरी), आशा मधुकर पाटील (श्री शिवाजी आदर्श प्राथमिक केंद्रशाळा, हातेड), सुजाता सुरेश पाटील (पंडीत जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळा, अकुलखेडे), ज्ञानेश्वर शांतीलाल निकम ( जि प शाळा, उनपदेव), मधुकर शांताराम भोई (आश्रमशाळा प्राथमिक, धानोरा), किरण रघुनाथ पाटील (उच्च माध्यमिक आश्रमशाळा, कर्जाणे), भारती अधिकराव पाटील (प्राथमिक आश्रमशाळा, हातेड), डॉ सोनल प्रमोद पाटील (ग.ह.रायसोनी इन्स्टिटयूट ऑफ इंजिनीरिंग आणि बिसनेस मॅनेजमेंट,जळगाव) आदिंना नेशन बिल्डर अवॉर्ड २०२२ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तसेच रोटरीतील शिक्षक सदस्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ चोपडा व आनंद सुपर शॉपी तर्फे आयोजित पर्यावरण पूरक श्रीगणेश आरास स्पर्धेचे बक्षीस वितरणही यावेळी करण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन संजय बारी यांनी तर प्रास्ताविक रोटे. ॲड. रुपेश पाटील यांनी केले वक्त्यांचा परिचय प्रा. डॉ. किशोर पाठक यांनी व आभार प्रदर्शन सचिव रोटे. गौरव महाले यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने शिक्षक, पालक व रोटरी सदस्य उपस्थित होते.
Post Views: 353
Previous Post

प्रताप विद्या मंदिर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

Next Post

पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल येथे अत्याधुनिक रोबोटिक्स प्रयोगशाळेचे उद्घाटन

Next Post
पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल येथे अत्याधुनिक रोबोटिक्स प्रयोगशाळेचे उद्घाटन

पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल येथे अत्याधुनिक रोबोटिक्स प्रयोगशाळेचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us