Tuesday, May 5, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

अत्याचार पिडीत चिमुरडीला न्याय मिळावा; चोपडा सकल नाभिक समाजातर्फे तहसीलदारांना निवेदनाद्वारे मागणी

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
September 17, 2022
in सामाजिक
0
अत्याचार पिडीत चिमुरडीला न्याय मिळावा; चोपडा सकल नाभिक समाजातर्फे तहसीलदारांना निवेदनाद्वारे मागणी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. १७  – तालुक्यातील सकल नाभिक समाजाच्यावतीने परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यामध्ये सेलू या गावी माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य घडले. नाभिक कुटुंबातील एका 11 वर्षाच्या चिमुरडीवर गावातीलच अंगद घुले आणि तुकाराम घुले या दोन नराधमांनी पाशवी बलात्कार केला आहे. याप्रकरणी जिंतूर पोलिसांनी दोन्ही नराधमांना अटक केली आहे. या आरोपींना कठोर शिक्षा होवून चिमुरडीला न्याय मिळावा या मागणीचे निवेदन चोपडा तहसीलदार यांना देण्यात आले.
या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील नाभिक समाजात व इतर समाजातही संतापाची लाट उसळली आहे. पिडीत मुलीला व तिच्या कुटुंबीयांना योग्य न्याय मिळावा आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील सर्व नाभिक समाजाच्या वतीने या घटनेचा निषेध म्हणून एक दिवस सलून व्यवसाय बंद ठेवण्यात आला. या प्रकरणातील आरोपी दोन्ही नराधमांना न्यायोचीत शिक्षा होईल अशा प्रकारच्या कारवाई करण्याची शिफारस देऊन चिमुकलीला आणि तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. सदर निवेदन प्रभारी नायब तहसीलदार रविंद्र माळी यांनी स्विकारले.
            यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळचे जळगांव जिल्हा उपाध्यक्ष उमाकांत निकम, जिल्हा सदस्य ज्ञानेश्वर सोनवणे, तालुकाध्यक्ष रविंद्र सैंदाणे, उपाध्यक्ष अनिल पवार, हिरालाल सोनवणे, सचिव राजेंद्र येशी, शहराध्यक्ष सोपान बाविस्कर, उपाध्यक्ष शत्रुघ्न सोनवणे, सचिव विलास निकम, मनोहर सोनगिरे, राजेंद्र सोनगिरे, बापु पवार, भिकाजी ठाकरे, दिलीप शिरसाठ, निलेश निकम, राहुल निकम, योगेश सोनवणे, गोकुळ सोनवणे, किशोर सैंदाणे, रविंद्र जाधव, जिवा महाले संघटना अध्यक्ष देविदास बाविस्कर, उपाध्यक्ष धनराज पगारे, सचिव गणेश खोंडे, प्रमोद बाविस्कर, प्रदिप बाविस्कर, अनिल सैंदाणे, पंढरीनाथ शिरसाठ, भुषण जगताप, दिनेश जगताप, दत्तात्रय बाविस्कर आदिंसह समस्त नाभिक समाजबांधवांची उपस्थिती होती.
Post Views: 528
Previous Post

चोपडा महाविद्यालयात जागतिक ओझोन दिन साजरा !!

Next Post

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये रंगभरण स्पर्धेचे यशस्वी आयोजन

Next Post
ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये रंगभरण स्पर्धेचे यशस्वी आयोजन

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये रंगभरण स्पर्धेचे यशस्वी आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

चोपडा येथे ‘एन-मुक्ता’ तालुका मेळावा उत्साहात संपन्न

चोपडा येथे ‘एन-मुक्ता’ तालुका मेळावा उत्साहात संपन्न

by टीम लोकप्रवाह
April 25, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 25 : चोपडा येथे आयोजित करण्यात आलेला ‘एन-मुक्ता’चा तालुका मेळावा उत्साहपूर्ण व यशस्वी वातावरणात संपन्न झाला....

विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये यशाचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये यशाचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

by टीम लोकप्रवाह
April 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 22 : येथील विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा गौरव करण्यासाठी...

चोपडा येथील खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा

चोपडा येथील खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा

by टीम लोकप्रवाह
April 21, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 21– चोपडा शहरात जुन्या वैमनस्यातून झालेल्या खून प्रकरणाचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या २४ तासांत...

🚨 स्पेशल रिपोर्ट | पदभार स्विकारताच धडाकेबाज कारवाई !!

🚨 स्पेशल रिपोर्ट | पदभार स्विकारताच धडाकेबाज कारवाई !!

by टीम लोकप्रवाह
April 19, 2026
0

टीम लोकप्रवाह,  चोपडा दि. 19 : चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये नव्याने पदभार स्वीकारलेल्या पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी कार्यभार हाती...

माजी खासदार दत्ताजी मेघे यांचे निधन; विदर्भात शोककळा

माजी खासदार दत्ताजी मेघे यांचे निधन; विदर्भात शोककळा

by टीम लोकप्रवाह
March 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा/ नागपूर, दि. २२ मार्च २०२६ : वर्धा जिल्ह्याचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते दत्ताजी मेघे यांचे आज...

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव दि. 14: जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने शनिवार, दि. 14 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us