Tuesday, May 5, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे पदवी प्रदान समारंभ उत्साहात संपन्न 

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
September 18, 2022
in शिक्षण
0
चोपडा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे पदवी प्रदान समारंभ उत्साहात संपन्न 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. १८ सप्टें. – येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे दिनांक 17 सप्टेंबर रोजी भगवान विश्वकर्मा जयंती निमित्ताने पदवी प्रदान समारंभ आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस. एन. भोई तर प्रमुख अतिथी म्हणून दिपक मिस्त्री (सिनीयर मॕनेजर, सुप्रीम पाईप) यांची  उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
आलेल्या मान्यवरांचे पुष्पगुच्छ देत स्वागत करतांना..
अखिल भारतीय व्यवसाय ऑगस्ट 2022 परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते अंतिम प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. अनेक पालक यावेळी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी संधीचं सोनं कशा पद्धतीने करावे व प्रत्येक परिस्थितीवर कशा पद्धतीने मात करावी हे आर. ए. पाटील यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. तसेच रोजगार करण्यापेक्षा स्वयंरोजगार कसा उभा करता येईल याचेही अनमोल मार्गदर्शन दीपक मिस्त्री यांनी विद्यार्थ्यांना केले. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस.एन.भोई यांनी देखील विद्यार्थ्यांना अप्रेंटीस बद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थी व पालक वर्ग
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन सुहास जोशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बेबी चौधरी, सुनिता इंगळे, आप्पासाहेब उगले, अनिल चव्हाण, अजय चव्हाण, प्रशांत पाटील, संतोष ठाकुर आदिंसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 372
Previous Post

चोपडा भाजपा युवा मोर्चातर्फे भव्य रक्तदान शिबीर संपन्न 

Next Post

चोपडा कसबे सोसायटीला सहकार बोर्डाचा पुरस्कार; उल्लेखनीय आणि अलौकिक कार्याचा गौरव!!

Next Post
चोपडा कसबे सोसायटीला सहकार बोर्डाचा पुरस्कार; उल्लेखनीय आणि अलौकिक कार्याचा गौरव!!

चोपडा कसबे सोसायटीला सहकार बोर्डाचा पुरस्कार; उल्लेखनीय आणि अलौकिक कार्याचा गौरव!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

चोपडा येथे ‘एन-मुक्ता’ तालुका मेळावा उत्साहात संपन्न

चोपडा येथे ‘एन-मुक्ता’ तालुका मेळावा उत्साहात संपन्न

by टीम लोकप्रवाह
April 25, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 25 : चोपडा येथे आयोजित करण्यात आलेला ‘एन-मुक्ता’चा तालुका मेळावा उत्साहपूर्ण व यशस्वी वातावरणात संपन्न झाला....

विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये यशाचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये यशाचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

by टीम लोकप्रवाह
April 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 22 : येथील विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा गौरव करण्यासाठी...

चोपडा येथील खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा

चोपडा येथील खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा

by टीम लोकप्रवाह
April 21, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 21– चोपडा शहरात जुन्या वैमनस्यातून झालेल्या खून प्रकरणाचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या २४ तासांत...

🚨 स्पेशल रिपोर्ट | पदभार स्विकारताच धडाकेबाज कारवाई !!

🚨 स्पेशल रिपोर्ट | पदभार स्विकारताच धडाकेबाज कारवाई !!

by टीम लोकप्रवाह
April 19, 2026
0

टीम लोकप्रवाह,  चोपडा दि. 19 : चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये नव्याने पदभार स्वीकारलेल्या पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी कार्यभार हाती...

माजी खासदार दत्ताजी मेघे यांचे निधन; विदर्भात शोककळा

माजी खासदार दत्ताजी मेघे यांचे निधन; विदर्भात शोककळा

by टीम लोकप्रवाह
March 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा/ नागपूर, दि. २२ मार्च २०२६ : वर्धा जिल्ह्याचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते दत्ताजी मेघे यांचे आज...

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव दि. 14: जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने शनिवार, दि. 14 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us