Saturday, September 12, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा येथील अध्यापक विद्यालयात नवोदितांचा प्रवेशोत्सव व बक्षीस वितरण समारंभ संपन्न

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
September 18, 2022
in शिक्षण
0
चोपडा येथील अध्यापक विद्यालयात नवोदितांचा प्रवेशोत्सव व बक्षीस वितरण समारंभ संपन्न
लोकप्रवाह, चोपडा दि. १८  – शतकोत्तर ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या चोपडा एज्युकेशन सोसायटीच्या अध्यापक विद्यालयात प्रथम वर्षाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व संस्थेच्या माजी सचिव स्व. संध्याताई मयूर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित व्हाॅलीबॉल स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ दि.16 सप्टेंबर रोजी संपन्न झाला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव माधुरी मयूर होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून वर्धिष्णू फाउंडेशन, जळगाव या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अद्वैत दंडवते व अभियंता विनीत पाटील उपस्थित होते. ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर प्रथम व द्वितीय वर्षाच्या छात्राध्यापकांनी स्वागतगीत सादर केले. प्रास्ताविकात प्राचार्य किरण पाटील यांनी डी.एल.एड. ची प्रवेश प्रक्रिया, श्रद्धेय संध्याताई मयूर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी विद्यालयात वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजनाबाबत तसेच वायसीएमओयु. च्या बी.ए., डी.एस.एम. अभ्यासक्रमाच्या निकालाबाबत सांगितले. याप्रसंगी व्हॉलीबॉल स्पर्धेचा विजयी सकाळ विभाग संघ व उपविजयी गावातील विभाग संघ येथील शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले व वायसीएमओयु.च्या डी. एस. एम. या अभ्यासक्रमाच्या परीक्षेमध्ये प्रथम येणारे प्रशांत एस. गुजराथी (मुख्याध्यापक, प्रताप विद्या मंदिर)यांचा सत्कार संस्थेच्या सचिव माधुरी मयूर यांच्या हस्ते करण्यात आला. विद्यालयातील कलाशिक्षिका मिनल पाटील यांनी स्व.संध्याताई मयूर यांच्या तयार केलेल्या पोर्ट्रेटचे अनावरण मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी अद्वैत दंडवते यांनी आपल्या मनोगतात समाजातील कचरा वेचणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुला-मुलींसाठी ‘आनंदघर’ सुरू करून अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना त्यांचे हक्काचे शिक्षण देण्याचा व आनंददायी बालपण देण्याचा संस्थेचा उपक्रम समजावून सांगितला व पुढे हा उपक्रम समग्र जिल्ह्यात राबविण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला. चोपडा शहरात देखील अशा वंचित मुलांसाठी ‘आनंदघर’ चालविले जाते त्याचे कामकाज विनीत पाटील हे यशस्वीपणे पाहत आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या संस्थेच्या सचिव माधुरी मयूर यांनी नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे प्रातिनिधिक स्वागत केले व आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक विचार करून अध्ययन करावे व उत्तमोत्तम असे गुण आत्मसात करावे,  कारण आपणच भविष्यातील पिढी घडविणार आहात असे प्रतिपादन केले. त्यासोबतच वर्धिष्णू फाउंडेशन मध्ये समाजातील वंचित मुलांसाठी कशाप्रकारे कामकाज सुरू आहे याचा देखील उल्लेख केला.
यावेळी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य एम.पी. पाटील, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य भूषण पवार, प्रताप विद्या मंदिराचे मुख्याध्यापक प्रशांत एस. गुजराथी, उपप्राचार्य जे.एस.शेलार, पर्यवेक्षक एस. एस.पाटील, संस्थेचे समन्वयक गोविंद गुजराथी, माजी प्राचार्य प्रा.योगिता बोरसे, क्रिडा शिक्षक नरेंद्र महाजन, अभिजीत देसले, एजाज शेख, समाधान माळी, प्रा. मनोहर मराठे व केंद्रसहाय्यक महेंद्र एल.पटेल, प्रा. एस. एस. देशमुख, प्रा.मीनल पाटील, दिपक विसावे, संजय पाटील, जितेंद्र पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा जयश्री पाटील यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. स्वाती गुजराथी यांनी केले.
Post Views: 584
Previous Post

घोडगाव येथील एसएनआरजी आयटीआय मध्ये दीक्षांत समारोह संपन्न

Next Post

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी; निवेदनाद्वारे चोपडा काँग्रेसची मागणी

Next Post
ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी; निवेदनाद्वारे चोपडा काँग्रेसची मागणी

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी; निवेदनाद्वारे चोपडा काँग्रेसची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

चोपड्यात अतिक्रमणावर हातोडा; रस्ते झाले मोकळे!

चोपड्यात अतिक्रमणावर हातोडा; रस्ते झाले मोकळे!

by टीम लोकप्रवाह
August 28, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 28 : शहरातील रस्ते मोकळे करून वाहतूक सुरळीत करण्यासह शहराचे सौंदर्य वाढविण्याच्या उद्देशाने चोपडा नगरपरिषदेने अतिक्रमणाविरोधात...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us