Sunday, July 26, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी; निवेदनाद्वारे चोपडा काँग्रेसची मागणी

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
September 20, 2022
in शेती विषयक, राजकीय
0
ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी; निवेदनाद्वारे चोपडा काँग्रेसची मागणी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. २०  – येथील शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने दि. २० रोजी तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावे तसेच ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी या मागणीचे निवेदन माजी जिल्हाध्यक्ष व नेते अॕड. संदिप सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले. यावेळी शहर व तालुका काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
निवासी नायब तहसीलदार सचिन बांबळे यांना निवेदन देतांना शहराध्यक्ष के.डी. चौधरी, तालुकाध्यक्ष प्रा. प्रदिप पाटील सह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते..
तालुक्यात सर्वदूर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामध्ये कापूस पिकाच्या कैर्या सडल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. मका, बाजरी, ज्वारी, सोयाबीन, उडीद व मूग यासह सर्व पिकांचे नुकसान झाले आहे. या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आधार देणे हे अत्यंत जरुरीचे आहे. त्याकरीता शासनाने तातडीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे तसेच ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी या मागणीचे निवेदन चोपडा शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने देण्यात आले. सदर निवेदन नायब तहसीलदार सचिन बांबळे यांनी स्वीकारले. तात्काळ मदत उपलब्ध न केल्यास शहर व तालुका काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
               यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. प्रदीप पाटील, शहराध्यक्ष के. डी. चौधरी, अशोक साळुंखे, शशिकांत साळुंखे, सुनील  बोरसे, धनंजय पाटील ,जगतराव बोरसे, कांतीलाल पाटील, अल्पसंख्याक सेल अध्यक्ष प्रा. झिशान सैयद, संदीप बोरसे, नंदलाल शिंदे, एनएसयुआय प्रदेश सचिव चेतन बाविस्कर, घनश्याम पाटील, मधुकर विठ्ठल बाविस्कर, परिवहन सेल उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष देवकांत चौधरी, घनश्याम पाटील, गोपाल नायदे, राहुल पाटील, समाधान कावीरे, कुणाल पारधी, इलियास पटेल आदींसह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 593
Previous Post

चोपडा येथील अध्यापक विद्यालयात नवोदितांचा प्रवेशोत्सव व बक्षीस वितरण समारंभ संपन्न

Next Post

चोपडा तालुका इलेक्ट्रोहोमिओपॅथी संघटनेची नुतन कार्यकारिणी गठीत !!

Next Post
चोपडा तालुका इलेक्ट्रोहोमिओपॅथी संघटनेची नुतन कार्यकारिणी गठीत !!

चोपडा तालुका इलेक्ट्रोहोमिओपॅथी संघटनेची नुतन कार्यकारिणी गठीत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

by टीम लोकप्रवाह
July 15, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा, दि. १५ जुलै : अपनाही घर प्रतिष्ठान या बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या मानव...

संकटात सहकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पोलीस निरीक्षक पवन देसले; कॅन्सरग्रस्त होमगार्डला चोपडा शहर पोलिसांकडून ₹२५ हजारांची आर्थिक मदत

संकटात सहकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पोलीस निरीक्षक पवन देसले; कॅन्सरग्रस्त होमगार्डला चोपडा शहर पोलिसांकडून ₹२५ हजारांची आर्थिक मदत

by टीम लोकप्रवाह
July 9, 2026
0

चोपडा (प्रतिनिधी) : "पोलीस दल हे केवळ कायदा व सुव्यवस्था राखणारे नसून संकटसमयी आपल्या सहकाऱ्यांसाठी कुटुंबाप्रमाणे उभे राहणारे कुटुंब आहे," याची प्रचिती...

बेघर व गरजू व्यक्तींच्या सेवेसाठी उल्लेखनीय कार्य नरेंद्र पाटील यांना “महानायक श्री. वसंतरावजी नाईक राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२५” जाहीर

बेघर व गरजू व्यक्तींच्या सेवेसाठी उल्लेखनीय कार्य नरेंद्र पाटील यांना “महानायक श्री. वसंतरावजी नाईक राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२५” जाहीर

by टीम लोकप्रवाह
June 19, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा - जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे तसेच “अपनाही घर प्रतिष्ठान संचलित मानव सेवा...

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

by टीम लोकप्रवाह
May 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव, दि. २२ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या जळगाव पथकाने मोठी कारवाई करत जामनेर येथील उपनिबंधक सहकारी संस्था...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us