Thursday, June 11, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपड्यात होणार वहनोत्सव व रथोत्सव उत्साहात !! श्री व्यंकटेश बालाजी संस्थानचा शेकडो वर्षाची संस्कृती जपणारा उपक्रम

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
September 24, 2022
in तालुका विशेष, संस्कृती
0
चोपड्यात होणार वहनोत्सव व रथोत्सव उत्साहात !! श्री व्यंकटेश बालाजी संस्थानचा शेकडो वर्षाची संस्कृती जपणारा उपक्रम
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. २४ सप्टे. – येथील श्री व्यंकटेश बालाजी संस्थांनाचा सुमारे चारशे वर्षांची विशाल परंपरा असलेला वहनोत्सव व रथोत्सव दि.२६ सप्टेंबर ते ७ आक्टोबर दरम्यान शहरात साजरा होणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष प्रवीण गुजराथी व विश्वस्तांनी यांनी दिली आहे.
            चोपड्याच्या या सांस्कृतिक वारसा असणाऱ्या ब्रम्होत्सव महोत्सवाला दि.२६ पासून वहनोत्सव सुरु होवून संबधीत वहनावर आरुढ होवून श्री बालाजी महाराजांची शहरातील ठराविक भागात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येईल. त्यानिमित्ताने या उत्सवाची मोठी उत्सुकता नागरिकांमध्ये दिसून येत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासकीय नियमांमुळे दोन वर्षे वहनोत्सव मंदिरातच पार पडला होता. तर रथोत्सव देखील जागच्या जागीच पार पाडून परंपरा जोपासली गेली होती.
वहन व त्याचा मार्ग खालीलप्रमाणे
 दि.२६  हत्ती ( गांधी चौक,बाजारपेठ ),
दि.२७ मोर (मोठा देव्हारा, गणेश कॅालनी)
दि.२८ गरूड (अरुणनगर,श्रीराम नगर)
दि.२९ सिंह (गुजर अळी)
दि.३० नागोबा( सुंदरगढी),
दि.१ आक्टोबर मारोती ( जबरेराम मंदिर,भाटगल्ली),
दि.२ सुर्य ( बडगुजर गल्ली),
दि.३ चंद्र ( पाटील गढी,मल्हारपुरा),
दि.४ वाघ ( गुजराथी गल्ली ),
दि.५ घोडा( बाजारपेठ),
६ व ७ आक्टोबरला रथोत्सव
श्री व्यंकटेश बालाजी संस्थानचा खान्देशात प्रसिद्ध असलेला रथोत्सव दि.६ व ७ ला होणार आहे. दि. ६ ला सकाळी१० वाजता गोलमंदिरा जवळील श्री बालाजी मंदिरापासून रथोत्सवाला प्रारंभ होईल. आशा टॅाकीज, ग्रामदैवत श्री आनंदी भवानी मंदिर या रथ मार्गाने बालाजीचा रथ आठवडे बाजार, पाटील दरवाजा या मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुक्कामी येईल. त्याठिकाणी रात्रभर भाविकांच्या दर्शनासाठी राहिल. तर दि.७ रोजी रथाच्या परतीच्या प्रवासाला सकाळी १० वाजता प्रारंभ होईल. बाजारपेठ मार्गाने पुन्हा गोलमंदिराजवळ येवून यंदाच्या वहनोत्सव रथोत्सवाचा समारोप होईल. या निमित्ताने रथोत्सव काळात शहरात दोन दिवसाची रथयात्रा देखील भरत असते. या शहराच्या श्रध्देचा भाग असलेल्या सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन श्री व्यंकटेश बालाजी संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
Post Views: 347
Previous Post

जळगांवचे पालकमंत्री पुन्हा एकदा गुलाबराव पाटील!!; पहा राज्यातील सर्व पालकमंत्र्यांची यादी…

Next Post

चोपडा कसबे सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

Next Post
चोपडा कसबे सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

चोपडा कसबे सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

by टीम लोकप्रवाह
May 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव, दि. २२ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या जळगाव पथकाने मोठी कारवाई करत जामनेर येथील उपनिबंधक सहकारी संस्था...

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

by टीम लोकप्रवाह
May 20, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : महाराष्ट्र शासनाच्या दि. 25 मार्च 2026 रोजीच्या महत्वपूर्ण शासन निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील...

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

by टीम लोकप्रवाह
May 9, 2026
0

जळगाव | प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव येथील शाखा अभियंता वर्ग-२ योगेश अभिमन्यू अहिरे (वय ४४) यांना ५ लाख...

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : गुणवत्ता, सातत्य आणि अथक परिश्रम यांचा सुरेख संगम म्हणजे यंदाचा दहावीचा निकाल ठरला आहे. नुकत्याच ऑनलाईन जाहीर...

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : तालुक्यातील घोडगाव येथील सी. बी. निकुंभ माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल संचलित नूतन शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेचा...

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : नुकत्याच जाहीर झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेच्या निकालात बालमोहन विद्यालय येथील विद्यार्थी संकेत अजय...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us