Sunday, September 13, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

गुणांचा सन्मान करणे म्हणजेच संस्कृतीचे दर्शन होय – अरुणभाई गुजराथी

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
September 28, 2022
in सामाजिक
0
गुणांचा सन्मान करणे म्हणजेच संस्कृतीचे दर्शन होय – अरुणभाई गुजराथी

लोकप्रवाह, चोपडा दि. २८ – येथील भारतीय जैन संघटना व आनंद सुपर शॉपी यांच्या संयुक्त विद्यमाने आनंदराज पॅलेस येथे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी हे होते. तर व्यासपीठावर महावीर पतसंस्थेचे चेअरमन प्रा. शांतीलाल बोथरा, जैन समाजाचे संघपती सुभाषचंद बरडिया, आनंद सुपर शॉपीचे संचालक व जैन दादावाडीचे संचालक डॉ. निर्मल टाटिया, भारतीय जैन संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा.डॉ.सुरेश अलीझाड, चोपडा पीपल्स बँकेचे संचालक नेमीचंद कोचर, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष निर्मल बोरा व महिला अध्यक्ष सपना टाटिया आदींची उपस्थिती होती.

               गुणांची कदर करा गुणांच्या सन्मान करा गुणवाल्यांना पुढे पाठवण्याचे समाजाने काम करावे जो गुणांच्या सन्मान करतो त्यात संस्कृतीचे दर्शन होते असते असे प्रतिपादन माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी भारतीय जैन संघटना व आनंद सुपर शॉपी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यात अध्यक्षीय भाषणातून केले. ते पुढे म्हणाले की, शिक्षकाचा सत्कार समाजाने करायलाच हवा. पिढी घडविण्याचे काम हा शिक्षकच करतो. शिकविण्यात जो आनंद आहे तो आनंद कोणत्याच क्षेत्रात नाही. त्यामुळे शिक्षकांनी सुद्धा चांगल्यात चांगले शिकवण्याकडे लक्ष द्यायला हवे. असे प्रतिपादन अरुणभाई गुजराथी यांनी केले. यावेळी व्यासपीठावरील डॉ.निर्मल टाटिया यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, गुणांच्या मागे धावू नका. जनरल नॉलेजकडे लक्ष दया, समाजात कसे वावरावे? कसे बोलावे ? याकडे लक्ष द्या तसेच गुणांबाबत पालकांनी मुलांवर दबाव टाकू नये असा सल्ला डॉ. टाटिया यांनी यावेळी दिला. तसेच प्रा. शांतीलाल बोथरा यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, स्पर्धेचे युग आहे या स्पर्धेत टिकण्यासाठी आपल्याला मेहनत करणे व मेहनत करून सिद्ध करणे याकडे लक्ष द्यावे लागेल.आगामी काळात नोकऱ्या मिळतीलच यावर अवलंबून राहू नका. परंतु चांगले शिक्षण घ्या त्यामुळे जिवनात काहीही करू शकतो, असे त्यांनी सांगितले.
         कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंगलाचरण महिला मंडळने केले. तदनंतर स्वागतगीत झाले. मान्यवरांचा सत्कार भारतीय जैन संघटनेचे गौरव कोचर, शुभम राखेचा, श्रेणिक रूनवाल, आकाश सांड, अभय ब्रम्हेचा आदी पदाधिकाऱ्यांनी केले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दहा आदर्श शिक्षकांचा स्मृतीचिन्ह व शाल देऊन सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्ती शिक्षकांचा परीचय अर्चना बोरा यांनी करून दिला. तसेच जवळपास 70 गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन यावेळी गुणगौरव करण्यात आला. यावेळी लतिश जैन, जितेंद्र बोथरा यांच्या वाढिवसानिमित्त त्यांच्या सत्कार करण्यात आला.
                 यावेळी उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी, महावीर पतसंस्थेचे माजी संचालक डॉ.आर.टी‌.जैन, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष धिरेंन्द्र जैन आदिंसह इतर मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दर्शन देशलहरा, चेतन टाटिया, उपाध्यक्ष मयंक बरडीया, दिनेश लोडाया, आनंद आचलिया, प्रवीण राखेचा, शुभम राखेचा, विपुल छाजेड आदींनी मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक राखेचा यांनी केले. सुत्रसंचालन मानसी राखेचा, मिनाक्षी जैन व अर्चना बोरा यांनी केले तर आभारप्रदर्शन आदेश बरडीया यांनी केले.
Post Views: 319
Previous Post

कुलगुरू डॉ. व्हि. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते बी. फार्मसी महाविद्यालयाच्या “वर्षग्रंथ-2022” चे प्रकाशन!!

Next Post

जिनिंग व प्रेसिंग विभाग लवकरच सुरु करणार!! – चेअरमन माजी आ.कैलास पाटील; तापी शेतकरी सुतगिरणी वार्षिक सभेत केले प्रतिपादन

Next Post
जिनिंग व प्रेसिंग विभाग लवकरच सुरु करणार!! – चेअरमन माजी आ.कैलास पाटील;   तापी शेतकरी सुतगिरणी वार्षिक सभेत केले प्रतिपादन

जिनिंग व प्रेसिंग विभाग लवकरच सुरु करणार!! - चेअरमन माजी आ.कैलास पाटील; तापी शेतकरी सुतगिरणी वार्षिक सभेत केले प्रतिपादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us