Sunday, July 26, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

जिनिंग व प्रेसिंग विभाग लवकरच सुरु करणार!! – चेअरमन माजी आ.कैलास पाटील; तापी शेतकरी सुतगिरणी वार्षिक सभेत केले प्रतिपादन

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
September 29, 2022
in सहकार
0
जिनिंग व प्रेसिंग विभाग लवकरच सुरु करणार!! – चेअरमन माजी आ.कैलास पाटील;   तापी शेतकरी सुतगिरणी वार्षिक सभेत केले प्रतिपादन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह,चोपडा दि. २९ – दोन वर्षे कोरनाचे संकट मोठ्या प्रयत्नांनी दुर सारल्यानंतर पार पडलेले आर्थिक वर्ष सूतगिरणीच्या प्रगतीत भर घालणारे असेल असे वाटले होते. परंतु कापसाचे भाव आणि प्रक्रिया केल्यानंतर सुत विक्री मधील तफावत कशी कमीतकमी राहून नुकसान टाळता येईल याचा कसोशीने प्रयत्न केला. पण सूतगिरणी तोट्यात जाण्यापेक्षा गिरणी बंद करावी लागली. आजही भावातील तफावत सूतगिरण्यांसाठी दृष्टचक्र ठरत आहे. महाराष्ट्रात अनेक सूतगिरण्या बंद आहेत, भविष्यात नक्कीच परिस्थिती बदलेल अशी आशा ठेवण्यास हरकत नाही. तथापी शासनाने सुतगिरण्यांना काही सवलती आणि अनुदान देण्याचे मान्य केले आहे. शासनाचे अनुदान पदरी पाडून तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून स्वतःची जिनिंग व प्रेसिंग लवकरच सुरु करणार असल्याची माहिती सूतगिरणीचे चेअरमन माजी आमदार कैलास पाटील यांनी दिली.
                       चोपडा तालुक्याच्या महत्वाकांक्षी सूतगिरणीच्या ३१ व्या वार्षिक सभेत चेअरमन माजी आ. कैलास पाटील अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. गुरूवारी दि.२९ रोजी सूतगिरणीच्या कार्यस्थळावर झालेल्या सभेत प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व श्री महालक्ष्मींच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी माजी शिक्षक आमदार प्रा. दिलीपराव सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. तर अहवाल वाचन जेष्ठ संचालक प्रकाश रजाळे व आर्थिक पत्रकांचे वाचन संचालक एस.बी.पाटील यांनी केले. यासभेत एकूण सात विषयांना सभासदांनी एकामताने मंजूरी दिली.
                याप्रसंगी माजी जि.प.अध्यक्ष गोरखतात्या पाटील, माजी शिक्षक आमदार प्रा.दिलीपराव सोनवणे, सूतगिरणीचे व्हाईस चेअरमन पी.बी.पाटील, संचालक तुकाराम पाटील, भाऊसाहेब पाटील, रंजना नेवे, जागृती बोरसे, राजेंद्र पाटील, माधवराव पाटील, माजी कृउबा उपसभापती नंदकिशोर पाटील, माजी संचालक प्रभाकर बडगुजर, माजी शेतकी संघ उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, जेष्ठ नागरिक संघाचे रमेश बाविस्कर, जनरल मॅनेजर विजय पाटील आदिंची मंचावर उपस्थिती होती.
Post Views: 374
Previous Post

गुणांचा सन्मान करणे म्हणजेच संस्कृतीचे दर्शन होय – अरुणभाई गुजराथी

Next Post

चोसाका च्या मासिक मीटिंगला तब्बल 13 संचालकांनी फिरविली पाठ!! ; संचालकांची नाराजी नेमकी कशामुळे?

Next Post
चोसाका चेअरमनवर फसवणुकीचा गुन्हा दाखल व्हावा माजी जि.प. सदस्याची पोलीस अधिक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी..!

चोसाका च्या मासिक मीटिंगला तब्बल 13 संचालकांनी फिरविली पाठ!! ; संचालकांची नाराजी नेमकी कशामुळे?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

by टीम लोकप्रवाह
July 15, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा, दि. १५ जुलै : अपनाही घर प्रतिष्ठान या बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या मानव...

संकटात सहकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पोलीस निरीक्षक पवन देसले; कॅन्सरग्रस्त होमगार्डला चोपडा शहर पोलिसांकडून ₹२५ हजारांची आर्थिक मदत

संकटात सहकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पोलीस निरीक्षक पवन देसले; कॅन्सरग्रस्त होमगार्डला चोपडा शहर पोलिसांकडून ₹२५ हजारांची आर्थिक मदत

by टीम लोकप्रवाह
July 9, 2026
0

चोपडा (प्रतिनिधी) : "पोलीस दल हे केवळ कायदा व सुव्यवस्था राखणारे नसून संकटसमयी आपल्या सहकाऱ्यांसाठी कुटुंबाप्रमाणे उभे राहणारे कुटुंब आहे," याची प्रचिती...

बेघर व गरजू व्यक्तींच्या सेवेसाठी उल्लेखनीय कार्य नरेंद्र पाटील यांना “महानायक श्री. वसंतरावजी नाईक राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२५” जाहीर

बेघर व गरजू व्यक्तींच्या सेवेसाठी उल्लेखनीय कार्य नरेंद्र पाटील यांना “महानायक श्री. वसंतरावजी नाईक राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२५” जाहीर

by टीम लोकप्रवाह
June 19, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा - जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे तसेच “अपनाही घर प्रतिष्ठान संचलित मानव सेवा...

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

by टीम लोकप्रवाह
May 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव, दि. २२ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या जळगाव पथकाने मोठी कारवाई करत जामनेर येथील उपनिबंधक सहकारी संस्था...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us