Sunday, July 26, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयात भव्य निबंध स्पर्धेचे आयोजन 

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
October 3, 2022
in शिक्षण
0
महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयात भव्य निबंध स्पर्धेचे आयोजन 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. ०३ – महात्मा गांधी जयंती व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या जिल्हा प्रशिक्षण व प्रबोधन समितीचे प्रदेश अध्यक्ष विनायक देशमुख व जिल्हा समन्वयक तथा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाने येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित माध्यमिक विद्यालयात तालुक्यातील माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी भव्य अशा निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. निबंध स्पर्धा दिनांक 3 ऑक्टोबर रोजी दुपारी बारा ते दोन या वेळेत पार पडली.
प्रतिमा पूजन करतांना उपस्थित मान्यवर
या निबंध स्पर्धेसाठी इयत्ता 8 वी ते 10 वी साठी स्वातंत्र्यलढ्यात गांधीजींचे योगदान, गांधीजींचे सत्याचे प्रयोग व मला समजलेले गांधीजी हे विषय होते. तर इयत्ता 11 व 12 वी साठी गांधी विचार आणि अहिंसा, गांधीजींचे ग्राम स्वावलंबाचे विचार व  गांधी ते महात्मा हे तीन विषय होते. या निबंध स्पर्धेत चोपडा शहर आणि तालुक्यातील माध्यमिक आणि ज्युनिअर महाविद्यालयातील जवळपास दिडशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
निबंध स्पर्धेबाबत मार्गदर्शन करतांना मुख्याध्यापक निळकंठ सोनवणे
या निबंध स्पर्धेचे उद्घाटन ज्युनि. महाविद्यालयाचे उपप्राचार्य बी. एस. हडपे यांच्या हस्ते तर करोडपती माध्यमिक कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक देवीलाल बाविस्कर यांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने करण्यात आले. यावेळी काँग्रेस सेलचे तालुका अध्यक्ष तथा ग. स. चे संचालक मंगेश भोईटे, अशोक साळुंखे, प्रा. शिरसाठ, एस. पी. पाटील, प्रा. बोरसे, एस. व्हि.पाटील व विविध माध्यमिक विद्यालयातून आलेले शिक्षक व्यासपीठावर उपस्थित होते. या निबंध स्पर्धेबाबत विद्यालयातील मुख्याध्यापक निळकंठ सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून स्पर्धेचे नियम समजविले. दुपारी बारा ते दोन वाजेदरम्यान ही स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धा यशस्वीतेसाठी विजय सोनवणे, अशोक सोनवणे, अशोक साळुंखे, मुख्याध्यापक एन. एस. सोनवणे यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 360
Previous Post

सेवा पंधरवाडा निमित्त उपजिल्हा रुग्णालय येथे शस्त्रक्रिया संपन्न; स्वतः जिल्हा शल्यचिकित्सकांनी केल्या शस्त्रक्रिया!!

Next Post

चोपडा नगरपरिषदेवर धडकला जन संघर्ष मोर्चा; शहरातील विविध समस्यांचा वाचला पाढा!! येत्या पंधरा दिवसात समस्यांचा निपटारा करणार: मुख्याधिकारी हेमंत निकम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

by टीम लोकप्रवाह
July 15, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा, दि. १५ जुलै : अपनाही घर प्रतिष्ठान या बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या मानव...

संकटात सहकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पोलीस निरीक्षक पवन देसले; कॅन्सरग्रस्त होमगार्डला चोपडा शहर पोलिसांकडून ₹२५ हजारांची आर्थिक मदत

संकटात सहकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पोलीस निरीक्षक पवन देसले; कॅन्सरग्रस्त होमगार्डला चोपडा शहर पोलिसांकडून ₹२५ हजारांची आर्थिक मदत

by टीम लोकप्रवाह
July 9, 2026
0

चोपडा (प्रतिनिधी) : "पोलीस दल हे केवळ कायदा व सुव्यवस्था राखणारे नसून संकटसमयी आपल्या सहकाऱ्यांसाठी कुटुंबाप्रमाणे उभे राहणारे कुटुंब आहे," याची प्रचिती...

बेघर व गरजू व्यक्तींच्या सेवेसाठी उल्लेखनीय कार्य नरेंद्र पाटील यांना “महानायक श्री. वसंतरावजी नाईक राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२५” जाहीर

बेघर व गरजू व्यक्तींच्या सेवेसाठी उल्लेखनीय कार्य नरेंद्र पाटील यांना “महानायक श्री. वसंतरावजी नाईक राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२५” जाहीर

by टीम लोकप्रवाह
June 19, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा - जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे तसेच “अपनाही घर प्रतिष्ठान संचलित मानव सेवा...

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

by टीम लोकप्रवाह
May 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव, दि. २२ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या जळगाव पथकाने मोठी कारवाई करत जामनेर येथील उपनिबंधक सहकारी संस्था...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us