Thursday, September 10, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

अवैध रेती वाहणारे टॕक्टर व ट्रॉली दुर्घटनाग्रस्त; महसूलच्या गस्ती पथकाच्या पाठलागानंतर घडला प्रकार!!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
December 7, 2022
in ब्रेकींग न्युज, क्राईम
0
अवैध रेती वाहणारे टॕक्टर व ट्रॉली दुर्घटनाग्रस्त; महसूलच्या गस्ती पथकाच्या पाठलागानंतर घडला प्रकार!!

लोकप्रवाह, चोपडा दि. ०७ डिसें. (संदिप ओली) – शहर व तालुक्यात सद्या अवैध वाळू वाहतुकीने जोर पकडला आहे. यावर अंकुश लागावा म्हणून रात्रभर महसूल प्रशासनाचे गस्ती पथक संपूर्ण तालुक्यात गस्त घालत असते. याचाच परिणाम म्हणून आज पहाटे पावणे सहा वाजता कारगील चौकातून शहरात प्रवेश करतांना एका अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या ट्रॕक्टरचा पाठलाग करत असतांना वेगात असलेले ट्रॕक्टर ट्रॉलीसह महावीर नगर नजीक पलटी झाले. ही घटना इतकी भयंकर होती की, या मध्ये टॕक्टर व ट्रॉली यांची चाके निघून पडली होती. व ट्रॉलीमधील वाळू रस्त्यावर पसरली. त्यामुळे पाठलाग करणाऱ्या पथकातील तलाठी संतोष कोळी हे किरकोळ जखमी झाले. त्यांना ताबडतोब उपजिल्हा रुग्णालयात नेत त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. सदर घटनेची माहिती कळताच तहसीलदारांसह महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी व पोलीस कर्मचारी ताबडतोब घटनास्थळी पोहोचले. आता सदर ट्रॕक्टर चालक व मालकावर पुढे काय कारवाई होते? हि उत्सुकता सर्वसामान्यांना लागली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अवैध वाळू वाहतुकीस आळा बसण्याकरीता महसूल प्रशासनाचे पथक रात्री संपूर्ण तालुक्यात गस्त घालत असतांना शहरातील कारगील चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे वाहन दिसताच पथकाने त्याचा पाठलाग केला असता सदर विनाक्रमांकाचे वाहन अतिशय वेगात शहरातील यावल नाका ते कारगील चौक दरम्यान असणाऱ्या रस्त्यावर माजी आमदार जगदीश वळवी यांच्या घराजवळ पहाटे साडे पाच ते पावणे सहा दरम्यान दुभाजकाला टक्कर देत रस्त्यावर पलटी झाले. घटनेची माहिती मिळताच तहसीलदारांसह सर्व अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले.  घटनास्थळाचा पंचनामा करुन सदर वाहने जेसीबी व क्रेनच्या सहाय्याने तहसील कार्यालयात नेण्यात आले. सदर घटना इतकी भयंकर होती की, यामध्ये ट्रॕक्टर व ट्रॉली टायर अक्षरशः वेगळे होवून पडले होते. घटना होताच वाहनचालक जागेवरुन पसार झाल्याचे सांगण्यात आले. सुदैवाने कुठलीही जीवीतहानी झाली नाही. सदर वाहन विनाक्रमांकाचे असल्यामुळे त्याच्या चेसीस नंबरवरुन वाहनमालकाची माहिती काढून त्याच्यावर गुन्हा दाखल करुन पुढील कारवाई करणार असल्याचे तहसीलदार अनिल गावीत यांनी सांगितले.
सदर घटना घडताच वाळू माफीयांकडून ट्रॕक्टर व ट्रॉली जेसीबीद्वारे ओढून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्याठिकाणी महसूल प्रशासनाचे कर्मचारी पोहोचल्यामुळे त्यांचा तो डाव फसला असल्याचे बोलले जात आहे. सदर गस्ती पथकामध्ये प्रभारी नायब तहसीलदार रविंद्र माळी, तलाठी संतोष कोळी, सुधाकर महाजन, हमिद पठाण, गजानन पाटील आदि होते. तर घटनास्थळी तहसीलदार अनिल गावीत, चोपडा मंडळाधिकारी मनोज साळुंखे, शहर तलाठी किरण महाजन आदिंसह इतर कर्मचारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. अद्यापपर्यंत कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही.
Post Views: 782
Previous Post

वेटलिफ्टींग स्पर्धेत प्रताप विद्या मंदिराचे विद्यार्थी चमकले; मुलांमध्ये गणेश महाजन प्रथम तर मुलींमध्ये प्रज्ञा महाजन द्वितीय!!

Next Post

१० हजाराची लाच घेतांना सहकार अधिकारी जेरबंद; जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई!!

Next Post
१० हजाराची लाच घेतांना सहकार अधिकारी जेरबंद; जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई!!

१० हजाराची लाच घेतांना सहकार अधिकारी जेरबंद; जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

चोपड्यात अतिक्रमणावर हातोडा; रस्ते झाले मोकळे!

चोपड्यात अतिक्रमणावर हातोडा; रस्ते झाले मोकळे!

by टीम लोकप्रवाह
August 28, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 28 : शहरातील रस्ते मोकळे करून वाहतूक सुरळीत करण्यासह शहराचे सौंदर्य वाढविण्याच्या उद्देशाने चोपडा नगरपरिषदेने अतिक्रमणाविरोधात...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us