Thursday, June 18, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

धक्कादायक .! विरवाडे गावात किरकोळ धक्का लागल्याचे कारणावरुन एकाचा खून!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
March 6, 2023
in ब्रेकींग न्युज, क्राईम
0
धक्कादायक .! विरवाडे गावात किरकोळ धक्का लागल्याचे कारणावरुन एकाचा खून!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. ०३ मार्च (संदिप ओली) : तालुक्यातील विरवाडे या गांवी दि. ०२ मार्च २०२३ रोजी रात्री ९ वाजेदरम्यान किरकोळ धक्का लागल्याच्या कारणावरुन आरोपींनी फिर्यादीच्या घरी जावून शिवीगाळ दमदाटी तसेच चापटा बुक्यांनी मारहाण करुन आरोपी सागर देविदास कोळी याने त्याचे जवळील चाकुने भोजु कोळी याचे मानेजवळ तसेच पाठीवर व इतर ठिकाणी मारुन गंभीर दुखापत करुन भोजु कोळी यास जिवेठार मारुन त्याचा खुन केला. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होवून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
याबाबत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दिनांक 02/03/2023 रोजी रात्री 8.30 ते 9.00 वाजे दरम्यान विरवाडे गांवी सबस्टेशनजवळ तसेच फिर्यादीचे घरासमोरील अंगणात आरोपी नामे सागर देविदास कोळी, दिपक सुभाष कोळी, कैलास गुलाब कोळी, मनोहर संतोष कोळी व शोभाबाई देविदास कोळी सर्व रा. विरवाडे यांनी संगनमत करुन आरोपी दिपक कोळी व फिर्यादीचा मुलगा भोजु कोळी यांचा एकमेकांना धक्का लागल्याचे कारणावरुन आरोपी यांनी फिर्यादीचा मुलगा भोजु कोळी व राजेंद्र कोळी यांना शिवीगाळ दमदाटी तसेच धक्काबुक्की केली. व आरोपी सागर कोळी याने फिर्यादीचा मुलगा राजेंद्र कोळी याचे कपाळावर दगड मारुन डोके फोडुन दुखापत केली. नंतर सदर भांडणाचा मनात राग ठेवुन आरोपी सागर देविदास कोळी व शोभाबाई देविदास कोळी हे फिर्यादीचे घरासमोर अंगणात येवुन फिर्यादी तसेच फिर्यादीचा मुलगा भोजु कोळी यास शिवीगाळ दमदाटी तसेच चापटा बुक्यांनी मारहाण केली. त्याचवेळी आरोपी सागर देविदास कोळी याने त्याच्याजवळील चाकुने फिर्यादीचा मुलगा भोजु कोळी याच्या मानेजवळ, पाठीवर तसेच इतर ठिकाणी मारुन गंभीर दुखापत करुन भोजु कोळी यास जिवेठार मारुन त्याचा खुन केला म्हणुन चोपडा शहर पोलीस स्टेशनला सीसीटीएनएस गुरनं. 95/2023 भादंवि कलम 302, 337, 323, 504, 506 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी दिपक सुभाष कोळी, कैलास गुलाब कोळी, मनोहर संतोष कोळी यांना पोलीसांनी रात्रीच ताब्यात घेवून अटक केली असुन आरोपी सागर कोळी उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. घटनेची माहिती कळताच तात्काळ चोपडा शहर पोलीसांनी परिस्थिती नियंत्रणात आणणेकामी विरवाडे गांवी व उपजिल्हा रुग्णालयात तगडा बंदोबस्त ठेवला होता.
यावेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले व पोलीस निरिक्षक के. के. पाटील यांनी विरवाडे गांवी घटनास्थळी व उपजिल्हा रुग्णालयात भेट देवून परिस्थितीची पाहणी केली. यावेळी पोलीस निरिक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक अजित सावळे, पोलीस उपनिरिक्षक घनश्याम तांबे, पोहेकॉं. जितेंद्र सोनवणे, शेषराव तोरे, प्रदिप राजपूत, पोना. संतोष पारधी, ज्ञानेश्वर जवागे, सुभाष सपकाळ, विलेश सोनवणे, जितेंद्र चव्हाण, मनोज साळुंखे, पोकाँ. शुभम पाटील, प्रकाश मथुरे, विजय बच्छाव व होमगार्ड आदिंसह इतर पोलीस कर्मचारी यांनी उपजिल्हा रुग्णालयात चोख बंदोबस्त ठेवला होता. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले हे करीत आहेत. चोपडा उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. गुरुप्रसाद वाघ यांनी जख्मींवर उपचार केले.
Post Views: 5,228
Previous Post

चोपडा महाविद्यालयात पदार्थविज्ञान विभागातर्फे ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ साजरा

Next Post

चोपडा महाविद्यालयात केंद्रीय अर्थसंकल्पावर आधारित चर्चासत्र संपन्न 

Next Post
चोपडा महाविद्यालयात केंद्रीय अर्थसंकल्पावर आधारित चर्चासत्र संपन्न 

चोपडा महाविद्यालयात केंद्रीय अर्थसंकल्पावर आधारित चर्चासत्र संपन्न 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

by टीम लोकप्रवाह
May 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव, दि. २२ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या जळगाव पथकाने मोठी कारवाई करत जामनेर येथील उपनिबंधक सहकारी संस्था...

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी : उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचे प्रशासनाला निर्देश

by टीम लोकप्रवाह
May 20, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : महाराष्ट्र शासनाच्या दि. 25 मार्च 2026 रोजीच्या महत्वपूर्ण शासन निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी चोपडा शहरातील शासकीय जमिनीवरील...

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

by टीम लोकप्रवाह
May 9, 2026
0

जळगाव | प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव येथील शाखा अभियंता वर्ग-२ योगेश अभिमन्यू अहिरे (वय ४४) यांना ५ लाख...

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

विवेकानंद विद्यालयाच्या ‘स्वरा’चा ऐतिहासिक शतकी झंकार १०० टक्के गुणांसह चोपडा तालुक्यात प्रथम; विद्यालयाचा निकाल ९९.२८ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : गुणवत्ता, सातत्य आणि अथक परिश्रम यांचा सुरेख संगम म्हणजे यंदाचा दहावीचा निकाल ठरला आहे. नुकत्याच ऑनलाईन जाहीर...

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

सी. बी. निकुंभ हायस्कुलमधून प्रणाली सोनार प्रथम; शाळेचा निकाल ८०.५५ टक्के

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : तालुक्यातील घोडगाव येथील सी. बी. निकुंभ माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल संचलित नूतन शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेचा...

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

बालमोहन विद्यालयाच्या संकेत जोशीचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

by टीम लोकप्रवाह
May 8, 2026
0

चोपडा प्रतिनिधी : नुकत्याच जाहीर झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेच्या निकालात बालमोहन विद्यालय येथील विद्यार्थी संकेत अजय...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us